BREAKING NEWS

Sunday, April 30, 2017

अचलपूर मध्ये विजग्राहक तक्रार निवारण शिबीर ३ मे ला

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी संवसु विभागातर्फे अचलपूर विभागीय महावितरण कार्यालय येथे विजग्राहक तक्रार निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजकाल विज ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत.यादृष्टीने अचलपूर 1/2,अचलपूर कँम्प व चिखलदरा उपविभागातील विज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींना पाहता अचलपूर महावितरण विभागीय कार्यालयातर्फे भव्य तक्रार निवारण शिबीराचे ३ मे २०१७ बुधवार ला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजता पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात ग्राहकांच्या तक्रारी एकुन घेण्यात येईल व त्यावर समाधान कारक उपाय सुचवून त्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.याप्रसंगी कार्यकारी अभियंता,सर्व सहायक अभियंता व अधिकारी वर्ग ग्राहकांचे समाधान व तक्रारींचे निरसन करण्यास उपस्थित राहणार आहेत तसेच विज बचत व सुरक्षित विज वापर यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सध्या विजेच्या मुळे होत असलेल्या अपघात टाळण्यासाठी सुध्दा या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी अचलपूर व चिखलदरा विभागातील विज ग्राहकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी घेऊन यावे त्यावर उपाय व निरसन करून घ्यावे असे विद्युत वितरण कंपनी विभागीय कार्यालय व ऊपविभाग चिखलदरा यांनी आवाहन केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.