BREAKING NEWS

Tuesday, May 30, 2017

*साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या वतीने पदयात्रा साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या संमेलनाचे आयोजन

    

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या पदयात्री साई पालख्‍यांच्या प्रतिनिधींचे संमेलन दिनांक 14 जून 2017 रोजी सिध्द संकल्प मॅरेज हॉल येथे आयोजित करण्‍यात आलेले असून सर्व पालखी मंडळांनी आपली नावे संस्थानच्या संरक्षण विभागाकडे नोंदवावीत असे आवाहन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केले.

      डॉ.हावरे म्‍हणाले, श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येतात. तसेच राज्‍यातून मुंबई, पुणे, नाशिक, शहापूर, भिवंडी, औरंगाबाद, अहमदनगर, जळगांव, धुळे आदी ठिकाणाहून व इतर राज्‍यांच्‍या कानाकोपऱ्‍यातून संपुर्ण वर्षभर शेकडो पदयात्री पालख्‍या घेवून शिर्डीत येत असतात. यापैकी अनेकांनी संस्थानकडे सेवेची विनंती केलेली आहे. शेगांवच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर साईसेवक योजना राबविण्याचा संस्थानचा मानस असून श्री साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षाच्‍या अनुषंगाने साईबाबा संस्‍थानला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. यामुळे पालखी सोबत येणा-या पदयात्री भाविकांना साईसेवक हा सन्मान देण्याचा आणि साईंची सेवा करण्याची संधी देण्याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे.

      यासाठी पालखीसोबत येणा-या साईभक्‍तांनी 21 व्‍यक्‍तींचा 01 गट तयार करुन त्‍यांची नोंदणी संस्‍थानकडे करावी. या गटामध्‍ये 20 सदस्‍य व 01 प्रमुख राहील तर या गटाला वर्षातून फक्‍त 07 दिवस सेवा करण्‍याची संधी दिली जाईल. अशा सुमारे 10 हजार 500 साई सेवकांची मदत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षात होणार असून ही सेवा करण्‍याचा पहिला मान पालखी सोबत येणाऱ्या पदयात्री भाविकांना देण्‍यात येईल. ही सेवा साईसेवकांनी मोफत द्यायची आहे. संस्‍थानच्‍या वतीने साईसेवकांची निवास, भोजन, नाष्‍टा व चहापाण्‍याची व्‍यवस्‍था मोफत करण्‍यात येईल. सर्व पालखी भक्‍त मंडळांनी आपली नावे श्री साईबाबा संस्‍थानच्‍या संरक्षण विभागाकडे कार्यालयीन वेळेत 02423-258885 या दुरध्वनी क्रमांकावर नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी संरक्षण अधिकारी श्री.मधुकर गंगावणे मो.नं.7720077288, श्री.विलास कोते मो.नं. 9049727215 व श्री.योगेश गोरक्ष मो.नं. 9970235007 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

या पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या संमेलनात प्रत्येक पालखीच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलेले असून साकुरी येथील सिध्द संकल्प मॅरेज हॉल येथे दिनांक 14 जून रोजी सकाळी 10.00 वा. ते दुपारी 02.00 वा. व दुपारी 03.00 वा. ते सायंकाळी 05.00 वा. यावेळेत हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे संस्थानचे अध्यक्ष डॉ.हावरे यांनी सांगितले.तरी पदयात्रा प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे विश्वस्त मंडळाने आवाहन केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.