BREAKING NEWS
Showing posts with label चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान )-. Show all posts
Showing posts with label चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान )-. Show all posts

Sunday, January 1, 2017

पत्रकारावर भ्याड हल्ला प्रकरणी आरोपींना १ दिवसाचा पीसीआर - लोखंडी पाईप, काचेच्या बॉटल्स व फायटर ने केला होता हल्ला

चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान )-

    चांदुर येथील सी सी एन न्युज चॅनल चे संचालक तथा अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल विष्णूआप्पा गवळी (वय 42) शनिवारी सकाळी कार्यालया मध्ये कामकाज करत असताना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या 10 ते 12 लोकांनी अमोल गवळी यांच्यावर लोखंडी पाईप,काचेचे बॉटल,व फायटर  ने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी अटकेतील ५ आरोपींना अमरावती येथील न्यायालयात रविवारी हजर केले असता त्यांना १ दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे.
   सविस्तर वृत्त असे की चांदुर रेल्वे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष तथा स्थानिक  सी सी एन न्युज चॅनल चे संचालक अमोल गवळी नेहमी प्रमाणे शनिवारी  (ता,31)सकाळी कार्यालयात बसले असतांना आशिष वानखडे, गाढवे यांच्या समवेत 10 ते 15 गुंड प्रवृतीच्या  लोकांनी कार्यालयात घुसून  त्यांच्या वर हल्ला चढविला व त्यांना कार्यालयाच्या बाहेर ओढून फायटर ,लोखंडी पाईप काचेच्या बॉटल जोरदार मारहाण करने सुरु केले. त्याच वेळीं अंकुश खाडे व सागर गावंडे या दोघांवरही हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोर हे क्वालिस गाडी (एमएच ३१/एएच०६३४)मधून व मोटार सायकल वर आले होते.अमोल गवळी यांना मारहाण होताना दिसताच  धावून आलेल्या नागरिकांनी हल्ले खोरांना परतावून लावले, नागरिकांची गर्दी वाढतच हल्ले खोरांनी आपला घटना स्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात अमोल गवळी यांच्या पाठीला, मानेला, व पायांना जबर दुखापत झाली. या प्रकरणी आरोपी आशीष प्रकाश वानखड़े रा. आमला, किशोर गोविन्द राठोड, अर्जुन रतंसिंग चौहान, दिनेश शालिकराम राठोड, प्रियत मधुकर भटकर
सर्व रा.अमरावती यांना अटक करून रविवारी त्यांना अमरावती येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना १ दिवसाचा पीसीआर देण्यात आला आहे. कारण या हल्ल्यात एकुन १०-१२ हल्लेखोरांसह २-३ दुचाकी वाहनांचा समावेश असल्याचे जखमींनी सांगितले. त्यामुळे उर्वरीत आरोपींच्या अटकेसाठी पीसीआर देण्यात आल्याचे समजते.

Friday, November 11, 2016

शिवसेनेचा नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा - स्वप्निल मानकर यांची अध्यक्ष पदाची उमेदवारी मागे



चांदुर रेल्वे:- (शहेजाद खान )-
Displaying IMG-20161111-WA0043.jpg

नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवार शेवटच्या दिवशी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्निल मानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना पक्षाचे जाहिर समर्थन दिले आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असतांनाच् सर्वच उमेदवार आपापल्या परीने जोर लावत आहे. अशातच नीलेश विश्वकर्मा यांना विविध पक्षाचे, सामाजिक संघटनेचे समर्थन मिळत आहे. नीलेश विश्वकर्मा हे नगर अध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार असून त्यांना आम्ही जाहिर समर्थन देत असल्याचे सांगत त्यांना बहुमताने विजयी करणार असल्याचे सांगितले, शुक्रवारी विनय कड़ू यांनी ही आपला अध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतल्याने अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ६ उमेदवार राहिले असून आज अपक्ष उमेदवारांना बोध चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराची धूम सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर  शिवशेनेच्या पदाधिकारी यांनी नीलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार कार्यालयात जाऊन त्यांना आपले समर्थन जाहिर केले. यावेळी शिवशेनेचे तालुकाध्यक्ष राजू निम्बर्ते, बंडू आंबटकर, राजूभाऊ मेटे, सुरेश यादव, किशोर यादव, रविन्द्र वांढरे, गजानन यादव, हेमंत हटवार, संदीप जरे,गजानन जरे,गजानन चव्हाण,राम भोसले, रोशन खंडार, गजानन बोबडे,प्रमोद खवड, त्रिलोक मानकानी, गणेश गिरपुंजे, मोरेश्वर राजुरकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सतपाल वरठे, विनोद वानखड़े आदीं उपस्थित होते..

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.