Showing posts with label
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--.
Show all posts
Showing posts with label
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--.
Show all posts
अवैध रेती वाहतुक करणे भोवले
चांदूर रेल्वे तहसीलदार राजगडकर यांची कारवाई
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--
अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतुक करणार्या ४ रेती ट्रक चालकांवर चांदूर रेल्वे तहसीलदार बि.ए.राजगडकर यांनी दंडात्मक कारवाई केली.क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतूकीचे त्यांना २ लाख ४४ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणार्या व्यवसायीकांना चांगली धडकी बसली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व रेती घाटासह वर्धा रेती घाटाचे हर्रास व्हायचं आहे. त्यामुळे रेती वाहतुकदारांनी आपला मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी घाटाकडे वळविला. बाभुळगाव तालुक्यातील नागरगाव, हिवरा येथील रेती घाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहुन आणणे सुरू केले. चांदूर रेल्वे तहसीलदार बि.ए.राजगडकर यांनी क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतुक करणार्यांवर धडक कारवाई सुरू केली. आज दिवसभर्यात धनोडी, मांजरखेड व चांदूर रेल्वे क्रॉसिंगजवळ असे एकूण चार रेतीचे ट्रक पकडले.त्यामध्ये २ ब्रॉस पेक्षा जास्त रेती आढळली. यामध्ये एमएच ३१/सिबी-१६४, एमएच०४/डिडी-१४९५ व एमएचजी-४७६६, एमएच१२/एफझेड-७०५० यांच्यावर प्रत्येकी ६१ हजार प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडुन एकुण २ लाख ४४ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईत मंडळ अधिकारी दिलीप इंगळे, विलास वाढोणकर, तलाठी योगेश वंजारी, मुकुंद सुडके, राजेश मलमकर, अरविंद सराड, निलेश लांजेवार, नितीन धोटे, कोतवाल रामेश्वर पवार यांनी मोलाची भुमिका बजावली.
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांची जनता दल (सेक्युलर) च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सर्वानुमते बिन विरोध निवड करण्यात आली.
मुंबई महाराष्ट्र प्रदेश जनता दल(से)च्या कार्यालयात प्रदेश अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवारी (ता.८) सकाळी ११ वाजता प्रदेश कार्यकारणीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे अध्यक्ष प्रा.शदर पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रतापराव होगाडे यांनी निवडीचा अहवाल प्रस्ताव सादर केला. अध्यक्षपदाकरीता प्रदेश उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग ढोले यांचे एकमेव नाव आल्याने जनता दल महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी चांदूर रेल्वेचे माजी आमदार डॉ.पांडुरंग ढोले यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. या सभेला मनवेल तुस्काने, अजमल खान, नाथा शेवाळे, सरिता मानकर, श्रीपत शिंदे यासह सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.ढोले यांचे उपस्थितांनी पुष्पहाराने जोरदार स्वागत केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ.पांडुरंग ढोले यांची निवड झाल्याबद्दल अवधुत सोनोने, संजय डगवार, छायाताई झाडे, शंकरराव आंबटकर, डॉ.पडोळे, मेहमुद हुसेन, सुधाकर सव्वालाखे, साहेबराव शेळके, देविदास शेबे, अर्जुन जिभकाटे, अंबादास हरणे, विठ्ठलराव गुल्हाने, बबलु स्थुल, दादाराव डोंगरे, दिलीप घोडे यांनी चांदूर रेल्वे स्टेशनवर येताच त्यांचे पुष्पहाराने जोरदार स्वागत केले. डॉ.पांडुरंग ढोले यांनी यापूर्वी १९९७-९८ साली जनता दलाचे अध्यक्षपद भुषविले होते. तर उपाध्यक्ष म्हणुन ते मागील दहा वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत होते.
पंकज भुरलेची विभागीय स्तरावर निवड
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--
अमरावती येथे झालेल्या जिल्हा स्तरिय ६.५ कि.मी. क्रॉसकंट्री रनिंग स्पर्धेत चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या एचएसएसी व्होकेशनलचा विद्यार्थी पंकज रवींद्र भुरले याने व्दितीय क्रमांक पटकविला असुन चांदूर रेल्वे तालुक्याचे नाव रोशन केले आहे.
अमरावती येथील जिल्हा स्टेडियम येथे पार पडलेल्या जिल्हास्तरिय ६.५ कि.मी क्रॉसकंट्री रनिंग स्पर्धेत पंकज रवींद्र भुरले ने दुसरे स्थान पटकविले असुन त्यांची विभागीय स्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या शिवाय पंकजने १५०० मिटर व ८०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय स्थान पटकविले. यापूर्वी पंकज भुरले चांदूर रेल्वे येथे झालेल्या तालुका स्तरिय १५०० व ८०० मिटर रनिंग स्पर्धेत अजिंक्य ठरला होता. तसेच संकेत रवींद्र भुरले ४०० मिटर रनिंग स्पर्धेत, अनिकेत भारत शिंगाडे हा ५ कि.मी.क्रॉसकंट्री रनिंग स्पर्धेत अव्वल आले होते. श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी एचएससी व्होकेशनलमध्ये शिकणारे पंकज भुरले, संकेत भुरले, अनिकेत शिंगाडे व रोहित भलावी यांनी ४०० मिटर रिले रनिंग स्पर्धेत अव्वल स्थान पटकविले होते. या सर्व विद्याथ्र्यांचा प्राचार्य सुरेश देवळे, पर्यवेक्षिका भारती अवधुतकर यांनी पुष्पगुच्छे देऊन कौतुक केले. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.