BREAKING NEWS
Showing posts with label नवी देहली. Show all posts
Showing posts with label नवी देहली. Show all posts

Wednesday, December 14, 2016

रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये ! - हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

देहलीच्या जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धर्माभिमानी हिंदू
      देहली - रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघामध्ये उपस्थित करावे आणि भारतीय रिझर्व बँकेने केंद्र सरकारकडे पाठवलेला ‘इस्लामिक बँकींग’चा प्रस्ताव सरकारने स्वीकारू नये, यांसाठी देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, अखंड भारत मोर्चा, बजरंग दल, वैदिक उपासना पीठ, वेद भारती संस्कार शाळा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुनिष्ठ धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.

हिंदूंच्या तीव्र विरोधाच्या परिणामामुळे केंद्र सरकारने इस्लामी बँकेची योजना गुंडाळली !

 नवी देहली - 


सर्वसमावेशक आर्थिक धोरण स्वीकारल्याने इस्लामी बँकेची आवश्यकता उरली नाही ! - केंद्र सरकार




रिझर्व्ह बँकेने केंद्रशासनास सादर केलेला इस्लामी बँकेचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला लिखित उत्तर देतांना पटलावर ठेवली. व्याजरहित आर्थिक व्यवस्था असलेली आणि कुराणावर आधारित असलेली इस्लामी बँकेची योजना रिझर्व्ह बँकेने केंद्रशासनास सादर करताच हिंदू आणि आर्थिक क्षेत्रांतील तज्ञांनी या योजनेला तीव्र विरोध केला होता. अनेक इस्लामी राष्ट्रांतही इस्लामी बँकेची योजना कार्यान्वित नसतांना ती धर्मनिरपेक्ष अशा भारतातच का लागू करण्यात येणार आहे, याचे कोडे हिंदूंना पडले होते. तसेच अशा एक एक योजनेसह एका दिवशी भारतात शरीया कायदाही लागू होईल, अशी रास्त भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळेच ही योजना गुंडाळून ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 
      राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार म्हणाले की, शासनाने जनधन योजना आणि सुरक्षा विमा योजना असे सर्वसमावेशक आर्थिक धोरण स्वीकारल्याने देशात आता इस्लामी बँकेची आवश्यकता उरली नाही, असे शासनाचे मत झाले आहे. 


काही देशांतून भारतात गुंतवणूक व्हावी यासाठी इस्लामी बँकेची योजना विचारार्थ होती; मात्र त्यासाठी देशाच्या सध्याच्या कायद्यांत मोठे पालट करावे लागतील हे लक्षात आल्याने ही योजना स्वीकारण्यास नकार देण्यात आला. 

Tuesday, December 6, 2016

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते यांची भेट

डावीकडून श्री. कार्तिक साळुंके, श्री. अभय वर्तक 
आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते

       देहली - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अनंत गीते यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समस्यांविषयी अवगत करण्यात आले. यावर त्यांनी शिवसेनेचे खासदार हे विषय संसदेत नक्की मांडतील, असे आश्‍वासन दिले. या प्रसंगी त्यांना सनातन पंचांग २०१७ भेट देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके उपस्थित होते.

Monday, December 5, 2016

नोटाबंदीचा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या अंताचा प्रारंभ ! - हिंदु महासभा

Image result for हिंदू महासभा


  नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूंच्या लग्नसराईला प्रारंभ होण्यापूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला. तसेच भाजपचे नेते आता इस्लामिक बँकिंगला प्रोत्साहन देत आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे मोदी यांच्या सत्ताकाळाच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे, अशी टीका अखिल भारतीय हिंदु महासभेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. 
        हिंदु महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामागील उद्देश अद्याप समजलेला नाही. सरकारच्या या निर्णयामुळे २००-३०० रुपये कमावणार्‍या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे. यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही. हिंदूंच्या लग्नसराईचे मुहूर्त चालू होण्याआधी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घोषित केला. त्यामुळे अनेक लोकांना याचा फटका बसला आहे. लोकांना त्यांच्या मित्रांकडून, नातेवाइकांकडून पैसे घ्यावे लागले. काहींना लग्नकार्य पुढे ढकलावे लागले. ऐन लग्नसराईच्या काळात हिंदूंना इतका त्रास सहन करावा लागत असतांना तथाकथित हिंदुत्वनिष्ठ पक्ष इस्लामिक बँकिंगसाठी प्रयत्न करत आहेे.
इस्लामिक बँकिग सेवा 
आरंभ करणार्‍या मंत्र्यावर टीका 
        पूजा पांडे यांनी महाराष्ट्रातील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, सुभाष देशमुख यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या सोलापूरमधील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेत इस्लामिक बँकिंग सेवा चालू केली. या सेवेच्या माध्यमातून व्याजरहित ठेवी स्वीकारल्या जातात.
        तसेच हा पैसा शून्य टक्के व्याजाने अल्पसंख्यांकांना दिला जातो. यावरून मोदी यांनी आता हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला आहे, अशी टीका पांडे यांनी केली.

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह !
        पंतप्रधान मोदी खोट्या सर्जिकल स्ट्राइकसाठी लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपदेखील महासभेच्या सदस्यांनी केला आहे. हिंदु महासभेचे उत्तर प्रदेश प्रवक्ते अशोककुमार पांडे यांनी म्हटले की, सीमावर्ती भागातील आतंकवादी कारवाया वाढत आहेत. प्रतिदिन सैनिक हुतात्मा होत आहेत. जर खरोखरच सर्जिकल स्ट्राइक झाला असेल, तर त्याचा परिणाम का दिसत नाही ? अशोककुमार पांडे पुढे म्हणाले की, मोदी यांचे ब्रँडिंग करून त्यांची भक्तमंडळी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विरोध केल्यास देशविरोधी असल्याचा शिक्का मारला जात आहे. सामान्य माणसाला नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रचंड त्रास होतो आहे; मात्र त्याच्याकडे त्रास सहन करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही.

Wednesday, November 30, 2016

सनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते प्रकाशन !

डावीकडून श्री. कार्तिक साळुंखे, श्री. अभय वर्तक,
श्री. गजानन कीर्तीकर आणि श्री. प्रसाद जोशी

      नवी देहली - शिवसेनेचे मुंबईतील खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते सनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे त्यांच्या देहली येथील निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांचे स्वीय साहाय्यक आणि मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी श्री. प्रसाद जोशी, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक अणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे उपस्थित होते. श्री. गजानन कीर्तिकर म्हणाले, हा ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि सर्व मनोविकारग्रस्तांनी हा ग्रंथ वाचून उपाय करावेत. 
      श्री. कीर्तिकर यांनी मनोविकारग्रस्त व्यक्तींवर उपाय व्हावेत अणि त्यांना निरोगी आयुष्य जगता यावे, या संदर्भात संसदेत एक खाजगी विधेयक सादर केले आहे. 
      आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव ही महत्त्वाची समस्या आहे. भारतात १० ते २० कोटी भारतीय विविध मानसिक आजारांना सामोरे जात असतांना याकडे कमालीचे दुर्लक्ष होते आहे, असे लक्षात आल्याने श्री. कीर्तीकर यांनी हे विधेयक सादर केले आहे.

Sunday, November 20, 2016

(म्हणे) नोटाबंदी करून भाजपने हिंदूंचे वाटोळे केले ! - केजरीवाल

स्वतः केजरीवाल यांनी हिंदूंचे किती भले केले, हेही त्यांनी सांगावे !

 नवी देहली - भाजप स्वतःला हिंदूंचा पक्ष समजतो; मात्र नोटाबंदीचा निर्णय घेऊन त्यांनी हिंदूंनाही सोडलेले नाही, त्यांनी हिंदूंचे वाटोळे केले आहे, अशी टीका देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून केले आहे. नोटाबंदीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासावरून त्यांनी हे विधान कले आहे.

Saturday, November 19, 2016

अयोध्येतील राममंदिराचे प्रकरण - पुढील आठवड्यात डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार !

 नवी देहली - सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. न्यायालयाला डॉ. स्वामी यांची सूत्रे ऐकायची असल्याने ही सुनावणी करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर आणि न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपिठासमोर डॉ. स्वामी यांनी शीघ्र आणि प्रतिदिन सुनावणीसाठी विनंती केल्यानंतर न्यायालयाने सुनावणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण साडेपाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने या याचिकेवर प्रतिदिन सुनावणी व्हावी, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले होते. डॉ. स्वामी यांनी अयोध्येत पाडलेल्या बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्याची अनुमती मागितली होती; तसेच त्यांनी रामजन्मभूमीविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणार्‍या अनेक याचिकांवरही शीघ्र सुनावणी करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती.

Sunday, November 13, 2016

दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवा !

देहलीच्या जंतरमंतर येथील 
राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी !

आंदोलन करतांना धर्माभिमानी

        नवी देहली - दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत गेल्या काही महिन्यांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. येथील पोलीस या हत्या आणि आक्रमणे वैयक्तिक वादातून होत असल्याचे सांगत आहेत; मात्र नुकत्याच अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने मान्य केले की, या हत्यांमागे एक सुनियोजित आणि व्यापक षड्यंत्र आहे. तसेच त्याच्याकडे काही हिंदु नेत्यांची सूचीही सापडली आहे. त्यामुळे या हत्यांचे आणि आक्रमणांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआयला) सोपवण्यात यावे, अशी मागणी येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाद्वारे करण्यात आली.

        तसेच हिंदु नेत्यांना आणि त्यांच्या परिवाराला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या आंदोलनात विविध हिंदु संघटनांसह हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारूदत्त पिंगळे हेही उपस्थित होते. 
        या मागणी व्यतिरिक्त डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊन्डेशन आणि पीस इन्टरनॅशनल स्कूल यांवर बंदी घालण्यात यावी, ही मागणी करण्यात आली. 
        बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मुसलमानधार्जिण्या राजकारणामुळे हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. याप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बंगालमधील हिंदूंचे रक्षण करून धर्मांधांवर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.