BREAKING NEWS
Showing posts with label नागपूर-:. Show all posts
Showing posts with label नागपूर-:. Show all posts

Friday, April 14, 2017

रोखमुक्त भारतासाठी प्रदर्शनाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद

* डिजिधन मेळाव्यात कॅशलेस व्यवहाराचे 72 स्टॉल्स
* विविध बँकांसह बचत गटाच्या उत्पादनाला प्रचंड प्रतिसाद
* भिम ॲप संदर्भात जनतेने जाणून घेतले व्यवहाराचे तंत्र
* जिल्हा प्रशासनातर्फे डिजिधन मेळाव्याचे यशस्वी आयोजन

नागपूर-: 

रोखरहित आणि डिजिटल इंडियाच्या पूर्वतेसाठी सर्वच बँक सज्ज असल्याचे चित्र आज मानकापूर येथील स्टेडियम जवळ आयोजित प्रदर्शनात दिसले. प्रदर्शनाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आर.पी. मराठे यांच्या हस्ते झाले.
दीप प्रज्वलन आणि फित कापून या प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वच बँकांचे झोनल व्यवस्थापक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांची उपस्थिती होती.
या भव्य अशा मंडपात 72 स्टॉल्सद्वारे कॅशलेस संदर्भात सुविधा दर्शविणारे साहित्य बँकांनी ठेवले होते. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, महाराष्ट्र बँक, इन्डस्इंड, कार्पोरेशन, विजय बँक आदींसह काही सहकारी बँकांनीही येथे ग्राहकांना माहिती दिली.
आधार नोंदणी, आधार माहिती बद्दल येथे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आली होती. हा संपूर्ण परिसर बीएसएनएल ने वाय-फाय ने ऑनलाईन ठेवण्यात मदत केली. याचा सर्वांना मुक्त वापर करण्याची सुविधाही देण्यात आली. खत विक्रेते, भारत पेट्रोलिअम, इन्डियन ऑईल यांनीही कॅशलेस व्यवहाराची साधने तसेच विविध प्रकारची कार्ड येथे उपलब्ध असल्याची माहिती दिली.
या ठिकाणी शासकीय स्टॉल्समध्ये आरटीओ, मुद्रांक नोंदणी विभागांचे स्टॉल्स होते तर युपीआय सेवा देणाऱ्या पेटीएम आणि जिओ मनी यांचेही स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले होते. याला उपस्थितांचा भरपूर प्रतिसाद लाभला.

Thursday, December 15, 2016

संसदीय लोकशाहीत विधानपरिषदेचे महत्व अनन्यसाधारण - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

नागपूर-

कायद्याची निर्मिती करताना त्यावर तटस्थपणे आणि शांतपणे विचारविनिमय करुन तो कायदा अधिकाधिक समाजहिताचा होण्याच्या दृष्टीने विधानपरिषद महत्वपूर्ण योगदान देत असते. या सदनाला समाजातील विचारवंत तसेच प्रज्ञावंत सदस्यांची मोठी परंपरा लाभली असून आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने परिषदेतील सदस्यांनी अनेक शासकीय योजनांना लोकाभिमुख बनविण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे संसदीय लोकशाहीत विधानपरिषदेचे महत्व अनन्यसाधारण आहेअसे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.     
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानभवनातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गात द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्वपूर्ण योगदान’ या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11 विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेविधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. नाईक निंबाळकर म्हणाले कीनिवडणुकांच्या राजकारणात ज्यांना विधीमंडळात काम करण्याची संधी मिळत नाही पण जे आपले ज्ञानअनुभव आदींच्या सहाय्याने राज्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतील अशा व्यक्तींसाठी विधानपरिषद हे महत्वाचे सांविधानिक व्यासपीठ आहे. विधीमंडळात प्रवेश करण्याचे मागचे दार’ असा होणारा उल्लेख पूर्णत: चुकीचा असून विधानपरिषदेतील अनेक मान्यवर सदस्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण चर्चांनी राज्याच्या विकासात्मक घडामोडींमध्ये महत्वाचे योगदान दिले आहेअसे ते म्हणाले.
आजच्या तरुणांची विविध विषयांवरील मते महत्वपूर्ण असून ती लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. राजकारणाला चांगल्यासुशिक्षित आणि संवेदनशील लोकांची गरज आहे. तरुणांमधून असे नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. राजकारणाविषयी असलेले गैरसमज दूर करुन तरुणांनी राजकारणात सहभागी व्हावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.     
अवर सचिव सुनिल झोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. एसएनडीटी विद्यापीठाची विद्यार्थिनी मेहफुजा शेख हिने आभार मानले.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.