अंनिस यालाही अंधश्रद्धा म्हणणार का ?
विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) - भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी क्रिकेट स्पर्धेतील दुसर्या कसोटीला १६ नोव्हेंबरपासून येथे प्रारंभ झाला. या सामन्याच्या आधी खेळपट्टीची पूजा करण्यात आली. या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, खेळपट्टीची देखरेख करणारे आणि मैदानातील कर्मचारी सहभागी झाले होते. सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी ही पूजा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या खेळपट्टीवर पहिल्यांदाच सामना खेळवण्यात येत आहे. या संदर्भात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. याआधीही अनेकदा अशा पद्धतीने पूजा करण्यात आल्या आहेत.’’