BREAKING NEWS

Tuesday, April 12, 2016

गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याविषयीच्या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीचा कायम विरोध राहील ! - श्री. सुनील घनवट, राज्य संघटक


 

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराची धर्मपरंपरा मोडून गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याच्या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते. मंदिराचे विश्‍वस्त असलेले जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हेच या धर्मद्रोही निर्णयाचे खरे सूत्रधार आहेत. गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. हिंदुत्ववादी, सामाजिक आणि पुरोगामी संघटनांची झालेली एकत्रित बैठक हा केवळ फार्स होता. हिंदु जनजागृती समितीने या बैठकीत धर्मपरंपरांच्या रक्षणाची भूमिका मांडली; मात्र जुना राजवाडा पोलीस स्थानकात पार पडलेल्या अंतीम बैठकीत जिल्हाधिकार्‍यांच्या प्रभावाखाली असलेल्या पोलीस प्रशासनाने महिलांना मंदिराच्या गर्भकुंडीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर शासकीय अधिकारी हिंदूंच्या धर्मपरंपरा कशाप्रकारे मोडीत काढतात, याचे हे ठळक उदाहरण आहे, अशा शब्दांत हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निर्णयाचा विरोध केला आहे. या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, १. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरांमध्ये चर्चेद्वारे काही पालट करण्याचे कार्य छत्रपतींच्या गादीनेही कधी केले नाही, त्यांनी या धर्मपरंपरेत कधीही हस्तक्षेप केला नव्हता. एक सर्वसाधारण सनदी नोकर या परंपरा नष्ट करत आहे. यावरून हे दिसून येते की, मंदिरांच्या सरकारीकरणामुळे हिंदु धर्म शासकीय नोकरांची बटीक बनला आहे. हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला लांच्छनास्पद आहे. २. मोगल आणि इंग्रज यांच्या राजवटीत ज्या हिंदूंच्या मंदिरांच्या धार्मिक परंपरा जपल्या गेल्या होत्या, त्या मोडीत काढण्याचे दुःसाहस डॉ. अमित सैनी यांनी केले आहे. ते मंदिराच्या धार्मिक परंपरांविषयी सजग असते, तर त्यांनी प्रथम मनकर्णिका कुंडावर उभारण्यात आलेले अवैध शौचालय आधी हटवले असते. कैद्यांच्या हातून देवीचा प्रसाद अपवित्र कारागृहात बनवण्याचा निर्णय असो कि देवीच्या मूर्तीवरील रासायनिक लेपन करून घेणे असो, या व्यक्तीला स्वतःची धर्मद्रोही विचारसरणी प्रचारित करायची आहे, हे स्पष्ट दिसून येते. ३. भाविक मनाच्या हिंदूंनीही आपल्या धर्मश्रद्धेच्या रक्षणासाठी आता धर्मपरंपरा मोडीत काढू पहाणार्‍यांना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. श्री महालक्ष्मी मंदिराची धर्मपरंपरा मोडून गर्भकुंडीत महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध कायम राहील, हे आम्ही या प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित करत आहोत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.