BREAKING NEWS

Friday, September 2, 2016

चांदूर रेल्वेत गोवर्धन चौकात बैल पोळा उत्साहात शेतकरी, शेतमजुरांचा जानवानी परिवाराने व अतुल मोरे यांनी शेला, श्रीफळ व गांधी टोपी देऊन केला सन्मान


चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /---
अपार कष्टातुन शेतकऱ्यांना  मदत करणाऱ्या  बैलाची उतराईसाठी वर्षातुन एकदा बैल पोळा सण साजरा करण्यात येतो. चांदूर रेल्वेत शहरात बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थानिक गोवर्धन चौक, खडकपुरा येथे पोळा उत्सव समितीच्या वतीने भव्य बैल पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शहरातील १०० बैलजोडीने सहभाग घेतला. त्याचप्रमाणे शहरातील शिवाजी नगर व महादेव मंदिर परिसरात बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोवर्धन चौकातील पोळा उत्सवात ढोल ताश्यांच्या गजरात व बँड पथकाच्या लयबध्द तालावर अत्यंत आकर्षक सजविलेल्या बैलजोड्या सामिल झाल्या होत्या. बार्शिंगे, आकर्षक झुल टाकलेले व सुंदर सजविलेल्या बैलजोड्या सर्वांना आकर्षीत करीत होत्या. शेतकऱ्यांची  सत्य स्थिती दर्शविणाऱ्या  झडत्यांचा बार उडत होता. यावेळी पोळ्यात आलेले सर्व शेतकरी व शेतमजुर बांधवाचे जानवानी परिवाराचे साजिद जानवानी, समीर जानवानी, शहबाज जानवानी यांच्या हस्ते शेला व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अतुल मोरे यांनी सर्व शेतकरी व शेतमजुर बांधवांना गांधी टोपी देऊन सन्मान केला. ढोल ताश्यांच्या गजरात भैसे पाटील यांची बैलजोडी पोळा उत्सव मैदानात आंब्याच्या तोरणाखाली येऊन उभी राहिली. धुपकर्ता सुरेश पेठे यांनी सर्व बैल जोडींना धुप दाखविले. भैसे पाटील यांच्या बैलजोडीचे पुजन होताच पोळा फुटला . सर्व जोड्या प्रथम मालकाच्या घरी गेल्या. शेतकरी पतीपत्नीने बैलजोडीचे पुजन करून त्यांना पुरणपोळीचा घास भरविला. त्यानंतर बैलजोडीचे घरोघरी पुजन करण्यात आले. शहरातील बैल पोळ्यात अनेकांनी सजविलेल्या बैलासोबत सेल्फी काढल्या. यावेळी शहरातील मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.प्रभाकर वाघ, पांडुरंग वंजारी, भाष्कर वाघ, दिगांबर गहुकार, सैय्यद जाकिर भाई, सुनिल वाघ, बाल्या माकोडे, मारोती भोयर, अजय बेराड, स्वप्निल माकोडे, ऋषीकेश शेलोटकर, तुकाराम कळंबे, रूपेश भोयर, हर्षल वाघ, सुरेंद्र कांडलकर, निरज वाघ, धुपकर्ता सुरेश पेठे, केशव वंजारी, केशव वानरे, पत्रकार गुड्डु शर्मा, उत्तमराव गावंडे, अरविंद भैसे, संजय नेवारे, रूपेश भोयर यासह पोळा उत्सव समितीचे सर्व कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.