चांदूर रेल्वे / शहेजाद खान /----
चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील ९ पाणवठ्यावर बुध्द पौर्णीमेला प्राणी गणना करण्यात आली. त्यामध्ये तृणभक्षी प्राण्यांची संख्या भारी असल्याचे दिसुन आले असुन निलगाय १३१ व चितळांची संख्या १२४ आढळली.
उपवनसंरक्षक निनु सोमराज यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वन परिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील जंगलात ९ पाणवठ्यावर वन्य प्राणी गणना पार पाडली. २१ मे बुध्द पौर्णीमेच्या सायंकाळ पासुन ते २२ मे च्या पहाटेपर्यंत प्राणी गणना करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी श्री.कासावार यांनी वन्य प्राणी गणनेचा अनुभव घेतला. प्राणी गणनेत तृणभक्षी प्राण्याची संख्या जास्त असुन निलगायची संख्या १३१, चितळ १२४ असुन पक्षांमध्ये मोरांची संख्या ९४, बिबट २, भेडकी १६,चौसिंगा १, रानमांजर ३, रानडुक्कर ९७, ससा ६, माकड १०९, कोल्हा ३, मुंगूस २ असे प्राणी आढळले. चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले. या कृत्रीम पाणवठयामध्ये सातत्याने पाणीपुरवठा केल्यामूळे या पाणवठयावर वन्य प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध होते. प्रामुख्याने ज्या भागात वन विभागाने कुरण व पाण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी भरपुर वन्य प्राणी आढळले.
Post a Comment