विशेष बातमी /---

आज सकाळी ८.५४ वाजता आपचे नेते आशिष खेतान यांनी ट्वीटरवरून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्या साधकाचा हात असल्याचे ट्वीट केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या ट्वीट मध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचा उल्लेख करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्याचे म्हटले. प्रत्यक्षात सीबीआयचे अधिकारी सनातन संस्थेच्या आश्रमात पोहोचण्यापूर्वीच आणि सीबीआयने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नसतांना आपचे नेते आशिष खेतान यांनी केलेले ट्वीट हे पूर्वनियोजित षड्यंत्र असल्याचेच उघड करते. खेतान यांनी महाराष्ट्र आणि गोवा येथे अनेक बाँबस्फोट घडवल्याचे आरोप केले आहेत; मात्र या प्रकरणी निकाल देतांना मा. न्यायालयाने सनातन संस्थेला कुठेही दोषी ठरवले नाही. इतकेच नव्हे तर, सनातन संस्थेला गोवण्याच्या दृष्टीने तपास केल्याचे ताशेरेही ओढले होते. एकीकडे आप पक्ष देहलीची सत्ता हातात असतांना पोलीस मात्र केंद्राच्या म्हणजेच भाजपच्या मंत्र्यांच्या अखत्यारित असल्याचे रडगाणे गातात, तर येथे मात्र भाजप सरकारच्या अगोदर आपच्या नेत्यांना सीबीआयच्या कारवाईची माहिती मिळते. म्हणजे हे सीबीआयचे अधिकारी आपचे पोपट असल्याचे उघड होत आहे.
Post a Comment