बुलढाणा / महेंद्र मिश्रा /---
पहिला महीना साधारण पण लहरी पाऊस.
दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस, अतिवृष्टी
संभवते,
तर तिसऱ्या महिन्यात चांगला पाऊस अतिवृष्टीही होईल,
असा अंदाज
भेंडवळमधील भविष्यवाणीत मांडण्यात आला आहे.
विदर्भासह
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी काल ९
मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी ६ वाजता करण्यात आली .
घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर
महाराज आणि पुंजाजी महाराज हे यावर्षीच्या पीक-पाण्याचा बाबतीतील
भविष्यवाणी आज सकाळी १0 मे
रोजी पहाटे 5 वाजता जाहीर करण्यात आली . या घटमांडणीकडे शेतकर्यांचे लक्ष
लागले होते भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे तीनशे वर्षांपेक्षाही
जुनी परंपरा असून, चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची सुरुवात केली
आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या, तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढय़ाच विश्वासाने जपली जात आहे.
आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या, तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढय़ाच विश्वासाने जपली जात आहे.
- संपूर्ण देशात चारा-पाण्याची उणीव जाणवेल
- तांदूळ, जवस यांची नासाडी होण्याचंही यात म्हटलं आहे. तर गहू, हरभरा पिकांच्या भावात सध्या तेजी मंदी राहील.
- मूग आणि उडीद पिकांची काही भागात नासाडी होईल तीळ पिक साधारण असेल, पण नासाडीही होईल, असंही भविष्यवाणीत वर्तवण्यात आलं आहे. तांदूळ, जवस यांची नासाडी होण्याचंही यात म्हटलं आहे.
देशात आर्थिक तणाव राहील. देश आर्थिक संकटात येईल. पंतप्रधानांना हे वर्ष बरे नाही. त्यांच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकटं येतील असेही मत या भविष्यवाणीत म्हटलं गेलं आहे.
देशाच्या संरक्षण खात्यावर जास्त ताण येईल. शिवाय, पर देशातून येणारी आव्हानही देशासमोर असेल. त्यामुळे सैन्यासमोरील आव्हानं वाढतील, असंही भेंडवळच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे.
Post a Comment