चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--
तालुक्यातील अमदोरी येथील शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी देतो असे आमिष देऊन स्थानिक अवैध सावकाराने त्यांची ३ एकर शेती हडपली.शेतकऱ्याने अवैध सावकारविरूध्द सहा.निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोन सावकारांविरूध्द अवैध सावकारी अधिनियम २०१४ अवैध सावकारी कायदा अतंर्गत कलम १६ नुसार कारवाई होणार आहे.
तालुक्यातील अमदोरी येथील शेतकरी भुजंग साहेबराव तायवाडे यांनी आई-वडिलांच्या उपचार व मुलाच्या शिक्षणासाठी श्रीकृष्ण रामचंद्र खेरडे व विनायक शंकर खेरडे कडून ९५ हजार कर्जाने घेतले. कर्जाची सुरक्षितता म्हणून भुजंग तायवाडे यांनी श्रीकृष्ण खेरडे च्या नावे दि.१९.११.१२ ला अमदोरीतील गट क्र.११९ मधील १ हेक्टर २१ शेत चांदूर रेल्वे दुय्यक निबंधक कार्यालयातून दस्त क्र.२०९३/२०१२ खरेदी करून दिले. यामध्ये बँकेचे २५ हजार व खरेदी खर्च १० हजार असे एवूâण ३५ हजार रूपये खेरडे यांनी दिलेल्या कर्जाच्या रक्कमेतून कापून ६५ हजार हातात दिले. श्री.तायवाडेच्या शेताला लागुन श्रीकृष्ण खेरडे यांचे १० एकर शेती असल्यामूळे त्यांचे जवळचे संबध होते. ९ महिण्यानंतर खेरडे यांनी पैशाचा तगादा लावला. त्यामूळे तायवाडे यांनी शेती विक्रीचा व्यवहार केला व इसारपोटी आलेले २५ हजार व शेती वाहितीतून मिळालेले ३०हजार असे एकूण ५५ हजार व सरकारी अनुदान २२ हजार रूपये खेरडेंना दिले. परंतु खेरडे यांनी शेतीची खरेदी तायवाडे यांच्या नावे करून न देता मुलाला संस्थेवर क्लार्क म्हणून लावून देतो असे आमिष दिले. याला ६ महिण्याचा काळ लोटूनही मुलाला नोकरी मिळाली नाही. त्यामूळे तायवाडे यांनी खेरडेकडे शेती खरेदी करून देण्याचा तगादा लावला. त्यावर खेरडेंनी तायवाडेंना मुलाच्या नोकरीसाठी ४ लाख खर्च झाले असून १० लाख द्या आणि शेती परत द्या अशी अट टाकून शेती हडपण्याचा प्रयत्न करून तायवाडे कुटूंबीयांचा छळ सुरू केला. शेतकरी तायवाडेंनी महाराष्ट्र सावकारी कायद्यातंर्गत सहाय्यक निबंधकाकडे तक्रार केली.श्रीकृष्ण खेरडे यांनी तायवाडे विरूध्द दिवानी खटला दाखल करून भुजंग तायवाडे यांचा अर्ज खोटा असल्याचा दावा केला होता.अवैध सावकारी अंतर्गत सहा.निबंधकाने श्रीकृष्ण खेरडे व विनायक कुबडे यांच्या घरी धाड टाकली.त्यामध्ये १६ जमीन खरेदीचे व्यवहार कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये अशा जमीनीवर स्वतः न राबता दुसऱ्याला विक्री केल्याचे सिध्द झाले. त्यामूळे त्यांचा अवैध सावकारी व्यवसाय असल्याचे सिध्द होत आहे. ऐवढेच नव्हेतर त्यांच्या विरोधात अवैध सावकारीच्या ४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तसेच राजु नागोराव कुकडे सोबत सुध्दा कोऱ्या स्टॅम्प पेपरवर कर्जाचा व्यवहार केल्याचे सुध्दा दिसुन आले. या प्रकरणात भुजंग तायवाडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरून महाराष्ट्र राज्य सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ अन्वये श्रीकृष्ण खेरडे व विनायक कुबडे कारवाईस पात्र असून त्यांच्या विरूध्द अवैध सावकारी कायदांच्या कलम १६ नुसार कारवाईचा अहवाल जिल्हा निबंधकाकडे पाठविण्यात आला आहे.
Post a Comment