रंगया रेपाकवार /--
गडचिरोली --- /---
गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून पहिल्याच पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण भागाला बसला असून नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अहेरी तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला मुलचेराच्या गोमणी गावात पाणी घुसल्याने नागरिकांना पलायन करावे लागले.जिल्ह्यात आता पर्यंत १२०.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मान्सुनच्या आगमानाने जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून सुटका झाली असली तरी मान्सुनच्या पहिलच्या पावसाने जिल्ह्यातील नदी नाले भरले.गेल्या दोन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.आतापर्यंत १२०.५ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी कामाला लागला मात्र दक्षिण गडचिरोली ला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.जिल्ह्यात अनेक भागात कमी उंचीच्या पुलामुळे पहिल्याच पावसाने नाल्यावरून पाणी वाहत आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी जाते गडअहेरी मार्गावरील नाल्याच्या वरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे.या भागातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटला आहे.या पुलावरून पूर पार करण्याच्या प्रयत्नात एक शिक्षकाची दुचाकी वाहून गेली मात्र सुदैवाने शिक्षक थोडक्यात बचावला.
मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली -- गोमणी आलापल्ली मार्गावरील दोनही नाले तुडुंब भरल्याने गोमणी गावाच्या दोनही बाजूला असलेल्या नाल्याचे पाणी गोमणी गावात घुसले त्यामुळे नागरिकांना इतर ठिकाणी पलायन करावे लागले .
Post a Comment