डॉ. आंबेडकर यांचे जुने मुद्रणालय आणि भवन पाडल्याचे प्रकरण
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील जुने ऐतिहासिक मुद्रणालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याचा विरोध म्हणून रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या वेळी आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक केली आणि साहित्याची मोडतोड करून दुकाने बंद करण्यास सांगितले. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. या घटनेमुळे या भागात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.
आनंदराज आंबेडकर या मोर्च्याचे नेतृत्व करत होते. आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांच्या देखत दुकाने आणि वाहने यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली, तसेच काही दुकानांतील पैसेही चोरण्यात आले. डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स इम्प्रूव्हमेंट या न्यासाकडे या दोन वास्तूंची मालकी होती. २७ जून या दिवशी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. न्यासाने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे; मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय आणि अन्य नागरिक यांनी विरोध दर्शवला आहे.
Wednesday, June 29, 2016
दादरमध्ये रिपब्लिकन सेनेकडून मोर्च्याच्या वेळी दुकानांवर दगडफेक आणि मोडतोड !
Posted by vidarbha on 4:53:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment