पाऊले चालती पंढरीची वाट !
आळंदी - माऊली, माऊली, जय जय रामकृष्ण हरि असा जयघोष आणि टाळ-मृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २८ जून या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे याची देही याची डोळा असा होता. परब्रह्माची भेट घेण्यासाठी निघालेल्या या पालखीमध्ये लक्षावधी संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत.
२८ जून या दिवशी पहाटे ४ वाजता घंटानाद, पहाटे ४.१५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक करण्यात आला. पहाटे ४.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत भक्तांच्या महापूजा आणि समाधी दर्शन हे एकाच वेळी चालू होते. दुपारी १२.३० वाजता माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी प्रस्थानासाठी महाद्वारात उभ्या असलेल्या रथाच्या पुढे आणि मागे चालणार्या प्रमुख मानाच्या ४७ दिंड्यांना प्रवेश देण्यात आला. मधल्या काळात देवस्थानच्या ब्रह्मवृंदानी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आकर्षक पोशाखाने सजवली होती. अनेक वारकर्यांनी माऊलींचे हे साजिरे आणि गोजिरे रूप आपल्या डोळ्यांत साठवून घेतले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची आरती करून उपस्थित मानकर्यांना नारळाचा प्रसाद वाटण्यात आला. त्यानंतर माऊलींची पालखी वीणा मंडपातून प्रस्थान ठेवल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी देऊळ वाड्याबाहेर आली. नगर प्रदक्षिणेनंतर पालखी नव्या दर्शनमंडपात विसावेल.
Wednesday, June 29, 2016
माऊलींचा गजर आणि टाळ-मृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान - थोड्याच वेळात पुणे कडे वाटचाल।
Posted by vidarbha on 4:51:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment