जुनागड (गुजरात) - देशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. त्यामुळे गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. डॉ. गोलकिया यांनी त्यांच्या ४ वर्षांच्या संशोधनामध्ये गीर जातीच्या ४०० हून अधिक गायींच्या गोमूत्राची सतत चाचणी केली. यानंतर त्यांनी १ लिटर गोमूत्रामधून ३ मिलीग्रॅम ते १० मिलीग्रॅम पर्यंत सोने काढल्याचा दावा केला आहे.
त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आपण प्राचीन ग्रंथांमध्येच गोमूत्रात सोने मिळाल्याचे ऐकत होतो; मात्र याचा कोणताही पुरावा नव्हता. यावर आम्ही संशोधन करण्याचा निर्णय घेतला. गीर जातीच्या ४०० हून अधिक गायींच्या गोमूत्राचे परीक्षण केले आणि आम्ही सोने शोधून काढले. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार डॉ. गोलकिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सदस्यीय चमूने क्रॉमैटोग्रॉफी-मास स्पेक्ट्रोमॅट्री तंत्रज्ञानाचा वापर करून गोमूत्राचे परिक्षण केले.
गोमूत्रामध्ये ३८८ औषधी गुण !
डॉ. गोलकिया म्हणाले, केवळ रासायनिक पद्धतीनेच गोमूत्रामधून सोने काढले जाऊ शकते. त्यांनी गायींच्या शिवाय उंट, म्हशी, मेंढ्या यांच्याही मुत्राचे परिक्षण केले; मात्र यात त्यांना सोने आढळून आले नाही. या संशोधनाच्या वेळी गायीच्या गोमूत्रामध्ये ३८८ असे औषधीय गुण मिळाले आहेत ज्यांमुळे अनेक आजार बरे केले जाऊ शकतात.
Wednesday, June 29, 2016
गायीपासून केवळ दूधच नाही, तर चक्क सोनेही मिळते !
Posted by vidarbha on 4:47:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment