मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयात केलेला जामीन अर्ज २८ जून या दिवशी फेटाळण्यात आला. या निकालामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. वर्ष २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे एन्आयएने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याआधारे त्या जामिनास पात्र असल्याचा दावा त्यांच्या जामीन अर्जात करण्यात आला होता.
बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता, ती साध्वींच्या नावे नोंद असली, तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंग्रा याच्या कह्यात होती. त्यामुळे या प्रकरणाचे खापर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर फोडले जाऊ शकत नाही, असा दावाही त्यांच्या अर्जात करण्यात आला होता; मात्र निसार अहमद सय्यद बिलाल या व्यावसायिकाने साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला होता. जमात-ए-उलेमा महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली होती. दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
Wednesday, June 29, 2016
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन अर्ज एन्आयएच्या विशेष न्यायालयाने फेटाळला
Posted by vidarbha on 4:46:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment