BREAKING NEWS

Wednesday, July 13, 2016

राज्य निवडणूक आयोगाकडून 191 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द - MIM चाही समावेश


        मुंबई /--
नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
       श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याला आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य असते. त्याचबरोबर सर्व उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध व्हावी; तसेच बाहुबळाचा वापर व आर्थिक बळाचा दुरुपयोग होऊ नये, या उद्देशाने ‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश, 2004 व 2009’ आणि ‘महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2009’ नुसार राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 359 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व 342 अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण 326 राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही विहित मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यापैकी 191 पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
नोंदणी रद्द करण्यात आलेल्या राजकीय पक्षांची (कार्यालयाच्या पत्त्यानुसार जिल्हानिहाय) नावे अशी: मुंबई- 1) ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस, 2) सत्यशोधक समाज पक्ष, 3) शिवराज्य पक्ष, दादर, 4) जनादेश पार्टी, 5) नॅशनल लोक तांत्रिक पार्टी, 6) सार्वभौमिक लोक दल, 7) राष्ट्रवादी समाजवादी पार्टी, 8) महाराष्ट्र राजीव काँग्रेस, 9) एस. राष्ट्रीय जनहित पक्ष, 10) राष्ट्रीय सर्वसमाज पार्टी (इंडिया), 11) दलित मुस्लिम आदिवासी क्रांती संघ, 12) राष्ट्रीय महाशक्ती पार्टी, 13) इंडियन नॅशनॅलिस्ट पार्टी (एन), 14) जनकल्याण सेना, 15) आंबेडकरावादी जनमोर्चा, 16) होली ब्लेसिंग पीपल्स पार्टी, 17) लोकांचे दोस्त (Friends of People), 18) राष्ट्रीय लोकजागृती पार्टी, 19) वॉर व्हेटरन्स पार्टी, 20) राष्ट्रीय भीम सेना, 21) भीमशक्ती रिपब्लिकन सेना, 22) भारतीय आवाज पार्टी, 23) किसान गरीब नागरीक पार्टी, 24) इंन्डिपेंन्डन्ट् कॅन्डिडेट्स पार्टी, 25) राष्ट्रीय जन परिवर्तन पार्टी, 26) घरेलू कागमार सेना पक्ष, 27) भारतीय अपंग विकास पक्ष, 28) रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), फोर्ट.
ठाणे/पालघर - 1) राष्ट्रवादी जनता पार्टी, 2) नेटीव्ह पीपल्स पार्टी, 3) भिवंडी विकास आघाडी  (एकता मंच), 4) आगरी समाज विकास आघाडी, 5) मीरा- भाईंदर विकास मंच, 6) कल्याण- डोंबिवली महानगर विकास आघाडी, 7) उल्हास विकास आघाडी, 8) राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार जनक्रांती सेना (महाराष्ट्र राज्य), 9) बहुजन विकास सेना, 10) शाहू सेना, 11) नॅशनल बहुजन काँग्रेस, 12) लोकहितवादी पार्टी, 13) भारतीय बहुजन परिवर्तन सेना, 14) कोनार्क विकास आघाडी, 15) भारत विकास मंच.
रायगड- 1) जनशक्ती आघाडी, पेण, 2) माथेरान विकास आघाडी, 3) अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती/इतर मागास वर्ग समाजाचा फक्त राखीव जागा गट, 4) कर्जत नागरी आघाडी.
सिंधुदूर्ग- 1) अखिल भारतीय क्रांतिकारी व्यक्ती विकास पक्ष.
नाशिक- 1) नाशिक शहर जिल्हा नागरी विकास आघाडी, 2) तिसरी आघाडी मालेगाव, 3) नाशिक शहर विकास आघाडी, 4) तिसरा महाज, मालेगाव, 5) मालेगाव विकास आघाडी,  6) नाशिक जिल्हा विकास आघाडी, 7) भारतीय भूमिपूत्र मुक्ती मोर्चा, 8) अधिकार सेना.
जळगांव- 1) शहर बचाव आघाडी, भुसावळ, 2) खानदेश विकास आघाडी, जळगाव, 3) महानगर विकास आघाडी जळगांव, 4) सावदा विकास आघाडी, 5) नगर विकास आघाडी, फैजपूर, 6) अमळनेर तालुका शहर विकास आघाडी, 7) मा. लोकनेते अनिलदादा देशमूख शहर विकास आघाडी, चाळीसगाव, 8) भारतीय जनता विकास आघाडी, 9) फैजपूर परिसर विकास आघाडी, 10) एरंडोल शहर विकास आघाडी, 11) जामनेर शहर विकास आघाडी, 12) अखिल भारतीय बजरंग दल, 13) लोकसंघर्ष एकता विकास आघाडी, भुसावळ, 14) धरणगाव शहर प्रगती आघाडी, 15) जळगाव जिल्हा जनता आघाडी, 16) राष्ट्रीय अल्पसंख्याक महासंघ
नंदुरबार- 1) जिल्हा विकास आघाडी, नंदूरबार, 2) जनकल्याण संघर्ष समिती, नवापूर.
अहमदनगर- 1) इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, अहमदनगर, 2) नेवासा तालुका विकास आघाड

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.