BREAKING NEWS

Monday, July 4, 2016

शरीयत कायद्यात कोणतीही लुडबुड सहन करणार नाही ! - ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

लक्ष्मणपुरी (लखनौ) -





समान नागरी कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पूर्णत: विरोध केला असून उत्तरप्रदेशमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत मतांच्या राजकारणासाठी भाजपकडून हे सूत्र उचलून धरण्यात येत आहे, असा आरोप केला आहे. १. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष कल्प सादिक एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत म्हणाले, मुसलमान त्यांच्या शरीयत कायद्यात कोणतीही लुडबुड सहन करणार नाहीत. केवळ मुसलमानच नाही, तर देशातील इतर अल्पसंख्य समाजही या कायद्याला विरोध करील.
२. बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महली केंद्रशासनाला चेतावणी देतांना म्हणाले, शासनाने समान नागरी कायद्यासाठी प्रयत्न केल्यास पर्सनल लॉ बोर्ड शांत बसणार नाही. गोष्ट केवळ मुसलमानांची नाही, तर देशात काश्मीरपासून मिझोरामपर्यंत वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे संसदेने बनवले आहेत.
३. राज्यात बहुतांशी मुसलमान धर्मगुरूंना वाटते की, राज्यात होणार्‍या निवडणुकांना समोर ठेवून हिंदूंची मते मिळवण्यासाठी भाजपला अशी सूत्रे चर्चेत आणायची असतात.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.