BREAKING NEWS

Monday, July 25, 2016

देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याला पर्याय नाही ! - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई -
 


शिवसेनेने सतत हिंदुत्वाची कास धरली. आम्ही हिंदुत्वासाठी आक्रमणे सहन करायची, संकटे अंगावर घ्यायची आणि इतरांनी मात्र मजा मारायची. हे किती काळ चालणार ? सरकार पालटले; पण सर्वसामान्यांचे आयुष्य पालटले का ? त्यासाठी काय करणार आहात ? आपल्या देशाला एक काहीतरी मार्ग आता स्वीकारावाच लागेल. तो जर का स्वीकारायचा असेल, तर या देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याव्यतिरिक्त दुसरा तरी पर्याय नाही. हे निधर्मीवादाचे चोचले आता खूप झाले. निधर्मीवादातून हिंदूंवरच अन्याय झालेला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी परखडपणे हिंदु राष्ट्राची मागणी केली. श्री. ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत दैनिक सामनामधून २४ जुलैपासून क्रमशः प्रसिद्ध होत आहे. त्यात श्री. ठाकरे यांनी वरील प्रतिपादन केले आहे.
श्री. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतील मांडलेली काही सूत्रे
१. सध्या देशामध्ये धुक्यासारखे वातावरण आहे. नक्की काय चालले आहे, तेच कळत नाही. नक्की कोण काय करत आहे, तेच कळत नाही आणि कारभार कोण करत आहे तेही कळत नाही.
२. इथेही पाकड्यांना अंगावर घेणारी शिवसेनाच आहे. पाकिस्तानचे कलाकार आले, क्रिकेटपटू आले, कुणी पुढारी आले की, आजही फक्त शिवसेनाच त्यांना विरोध करते. पाकिस्तान हा काही एकट्या शिवसेनेचाच शत्रू नाही.
३. काश्मीरमध्ये जे काही हिंदू मेलेत, ते आमच्या सारखे रक्तामांसाचे आहेतच. बाकी इतर राजकीय पक्षांतील हिंदू काय करत आहेत ? कि त्यांना हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते ? मी म्हणेन अतिरेक्यांना दम भरण्यासाठी तरी या देशातील हिंदू एक होणार आहेत कि नाही ?
४. ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी प्राणत्याग केले, त्यांच्या विचारांचे सरकार जम्मू-काश्मीर आणि केंद्रात असतांना हे सर्व घडते याचे वाईट वाटत आहे.
५. जो हिंदु हित की बात करेगा वो ही देश पे राज करेगा, अशीसुद्धा घोषणा होती. मग हे सर्व लोक कुठे गेले ? अयोध्येमध्ये मंदिर होईल तेव्हा होईल; पण अमरनाथमध्ये आपले एक मंदिर आहे. त्या मंदिराची आपली यात्रा आहे. यात्रा जर आतंकवाद्यांमुळे बंद पडत असेल, तर हे दायित्व नेमके घ्यायचे कोणी ?
६. जर हिंदुत्व बाळगणे हा आपल्या देशात गुन्हा ठरवला जात असेल, तर मग निधर्मीपणाच्या विषयीतरी पक्षपात करू नका. सर्वधर्मसमभाव लागू करून कारभार केला, तरी काश्मीरातील अमरनाथ यात्रा तुम्हाला चालू ठेवावीच लागेल. पण ना धड हिंदुत्व आणि ना धड निधर्मीपणा अशा कात्रीत आपण अडकलो आहोत.
७. हिंदुत्वावर संकट आले की एका बेधडकपणाने शिवसेनाप्रमुख ते आपल्या डोक्यावर घेत होते आणि सर्व हिंदूंना दिलासा देत होते. ही संकटे शिवसेनाप्रमुखांनी अंगावर घेतली आणि बाकीच्यांनी मात्र हिंदुत्व-हिंदुत्व करत सत्तेची झूल अंगावर घेतली. हा जो फरक आहे तो मोठा आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.