दिल्ली /--
मोदी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री असलेल्या केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री नजमा हेपतुल्ला यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठवला आहे.
तसेच नजमा यांच्या पाठोपाठ केंद्रातील अवजड उद्योग राज्यमंत्री श्री जी.एस. सिद्धेश्वर यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात नजमा हेपतुल्ला या 75 वर्षांवरील सर्वात वयस्कर मंत्री होत्या. त्यांचे सहकारी असलेले मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती देत त्यांना अल्पसंख्यांक मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. तसेच सिद्धेश्वर यांच्या जागी बाबुल सुप्रियो यांची अवजड उद्योग राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
दरम्यान, नजमा हेपतुल्ला यांनी आपला हा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Post a Comment