BREAKING NEWS

Monday, July 11, 2016

अन्वेषणातील आपची ढवळाढवळ म्हणजे सीबीआयच्या विश्‍वासार्हतेवरच शंका ! - श्री अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

 पुणे---   -

 

 डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अन्वेषण कार्यात आपच्या नेत्याने ढवळाढवळ करणे म्हणजे सीबीआयच्या विश्‍वासार्हतेवरच शंका उभी रहाते. सनातनची अपकीर्ती करण्यासाठी आपच्या नेत्यांचा वापर करण्यात आला. हिंदुत्वाचे कार्य नष्ट करण्यासाठी अंनिसने केलेले अनेक गैरव्यवहार सनातनने समोर आणले असल्यानेच अंनिस सनातनवर बंदीची मागणी करत आहे. खरे खुनी पोलिसांना मिळत नाहीत; म्हणून निर्दोष साधकांना अटक करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. अटक केलेल्यांच्या विरोधात पुरावे मिळत नसल्याने खोटे साक्षीदार उभे केले जात असले, तरी साधकांच्या पाठीशी भगवंत आहे, असे प्रखर वक्तव्य सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी ९ जुलै या दिवशी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आणि संस्थेचे कार्य समजून न घेता सनातनवर बंदी घालण्याचा विचार करणे, हा सनातन आणि हिंदुत्व यांवरील मोठा अन्याय आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करावी आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवावा, या मागणीसाठी पुण्यातील महाराणा प्रताप उद्यानासमोर ९ जुलै या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे अधिवक्ता चंद्रकात भोसले, अधिवक्ता सचिन पोटे, होय हिंदूच संघटनेचे श्री. स्वप्नील धांडेकर, हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे श्री. अभिजीत बोराटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुधाकर संगनवार, योग वेदांत समितीचे श्री. जगदीशभाई कनोज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे आदी मान्यवर आणि १२० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.