BREAKING NEWS

Thursday, July 14, 2016

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी ! - हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुंबई - ढाका येथील आतंकवादी आक्रमणानंतर डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी आज गदारोळ उठला आहे; मात्र हिंदु जनजागृती समितीने त्यांची विद्वेषपूर्ण भाषणे आणि सीडी (ध्वनीफिती) यांच्याविषयी वर्ष २०१२ मध्येच आंदोलने करून पोलीस तक्रारीही केल्या होत्या. यापैकी मुंबई, सोलापूर, सावंतवाडी आणि अकोला या ठिकाणी डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात एफ्आयआर् देखील नोंद झाले. तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस तत्कालीन काँग्रेस सरकारने दाखवले नाही; याउलट काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री के. रहमान खान यांनी १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि सुदर्शन टीव्ही हे डॉ. झाकीर नाईक यांच्याविषयी खोटा प्रचार करत आहेत, अशी तक्रार करणारे पत्र तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांना पाठवल्याचे आता उघड झाले आहे.
यातून झाकीर नाईक यांना पाठीशी घालण्याचे पाप काँग्रेसने केल्याचे स्पष्ट होत आहे. जर त्याच वेळी समितीच्या तक्रारींच्या आधारे झाकीर नाईक यांच्यावर कारवाई केली असती, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेकडो मुसलमान युवक आतंकवादाकडे वळले नसते आणि अनेक आतंकवादी आक्रमणे रोखता आली असती. लादेनला ओसामाजी म्हणणारी काँग्रेसी संस्कृती येथेही दिसून येते. या प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा गैरवापर करून के. रहमान खान यांनी देशविरोधी मुसलमानांना पाठीशी का घातले ? मनीष तिवारी यांनी हे प्रकरण का दाबले ? मुसलमानांचे तुष्टीकरण कि देशहित, यामध्ये काँग्रेसचे प्राधान्य काय आहे ? याची उत्तरे आज काँग्रेसने द्यायला हवीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही मागणी करण्यात आली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. हिंदु जनजागृती समितीने कायमच डॉ. झाकीर नाईकसारख्या राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात भूमिका घेतली आहे; परंतु मतांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेस सरकारने आधी समितीचे संकेतस्थळ बंद पाडले आणि आज खोटे आरोप करून समितीवर बंदी घालण्याची मागणी ते करत आहेत.
२. प्रत्यक्षात आतंकवादाच्या समर्थकाला पाठीशी घातल्याच्या पापाविषयी काँग्रेस पक्षावर मोदी सरकारकडून कारवाईची अपेक्षा आहे.
३. गेल्या २ दिवसांपासून ओवैसी, अबू आझमी यांच्यासह अनेक मुसलमान संघटनांनीही डॉ. झाकीर नाईक यांचे समर्थन करत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.
४. या सर्वांना हिंदु जनजागृती समिती आवाहन करू इच्छिते की, डॉ. झाकीर नाईक यांच्या पाकिस्तानी आतंकवादी हाफीज सईदच्या जमात-उद्-दावा या संघटनेशी असलेल्या उघड संबंधांविषयी, हिंदूंच्या देवतांच्या केलेल्या अवमानाविषयी, लादेन आणि आतंकवाद याचे उघड समर्थन करणार्‍या भाषणांविषयी आधी भूमिका स्पष्ट करावी ! अन्यथा राष्ट्रप्रेमी नागरिक उद्या तुम्हालाही आतंकवादाचे समर्थक म्हणतील !

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.