बुलडाणा//दयालसिंग चव्हाण//- :- संग्रामपुर तालुकयातील जिल्हा परीषद हायस्कुल संग्रामपुर येथील शिक्षकांचे रिक्त़ पदे असल्याने   संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे   यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी  यांच्या कॅबिनचे दार बंद करुन त्यांना कोंडुन ठेवण्यात आले. जिल्हा परीषद हायस्कुल संग्रामपुर मध्ये शिक्षकांची एकुण 20 पदे मंजुर आहेत. त्यापैकी मुख्याध्यापकासह 12 शिक्षक कार्यरत आहे. याठिकाणी विद्यार्थी , विद्यार्थीनी एकुण पटसंख्या 650 असुन वर्ग तुकडया 15 आहेत. तसेच या जि.प.हायस्कुलमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी निवेदन सुध्दा दिले. अद्यापर्यंत शिक्षक न मिळाल्याने त्यांनी 29 ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये पाठविलेच नाही. शाळा सुरु आहे पण विद्यार्थीच नाही अशी माहिती मिळताच तालुकयातील खळबळ माजल्याने तात्काळ येथील जि.प. शाळेंची शिक्षकांची कमतरता लक्षात आल्यावरुन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे आणि आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष बाबुलाल इंगळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.हिरोळे यांच्या दालनात जाऊन जाब विचारण्यासाठी घेराव घातला अखेर बिडीओ यांच्या कॅबिनचे दार बंद करुन त्यांना कोंडुन ठेवले. काही वेळाने जि.प.चे शिक्षणधिकारी यांनी दखल घेऊन तत्काळ शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यामुळे कॅबिनचा दरवाजा उघडण्यात आला . यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष बाबुलाल इंगळे , पालकमंडळी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment