प्रमोफ नैकेले /-----
*अचलपूर* :- अनेक वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या राहमानिया हायस्कूल व ज्युनियर काँलेज मुळे अचलपूर आणि तालुक्याच्या अल्पसंख्याक वीद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळत आहे बी. ए .मर्चन्ट यांचे अध्यक्षतेत चालत असलेली रहमानिया संस्थेच्या शाळेचे प्राचर्य मो आदिल राशीद नेहमी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना एकीकडे अल्पसंख्याक शिक्षणामध्ये सुधारणा झाली असून विद्यार्थी डाक्टर ,इंजीनियर ,वैज्ञानिक पदावर आपल्या यशाची पताका लावत आहे.शाळेत पांचवी ते बारावी पर्यंत वर्ग चालतात येथे 1657 विद्यार्थी शिक्षण घेतात दर वर्षी दाहवीचे सेमि इंग्लिशचा निकाल 95 टक्के तर दाहवीचा निकाल 85 टक्क्यापेक्षा जास्त राहतो. शाळेमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यां करीता वीवीध प्रकार चे कार्यक्रम घेतले जातात ही जिल्ह्यातील एक मात्र उर्दू शाळा आहे जेथे एन. सी.सी.कैम्प वर विद्यार्थ्यांना घेवून जातात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून येथे यशवंतराव चव्हान मुक्त विद्यापीठ चालू केले आहे जेथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना बी.ए.पर्यंत चे शिक्षण पूर्ण करीत आहे.रहमानिया संस्थेद्वारा शाळा व काँलेज मध्ये सुविधा असल्याने आज अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षणामध्ये यश संपादन करीत आहे.[ उत्तम शिक्षण देने हेच आमचे लक्ष असे रहमानिया शाळेचे प्राचार्य मो आदिल रशीद यांनी सांगितले याअगोदर शहर मध्ये अल्पसंख्याक शिक्षणाची काही व्यवस्था नव्हती पण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा शिक्षणात पडत असलेला दर्जा पाहून संस्थेच्या अध्यक्षांनी येथे शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्द करून दिली.आता आमचा एकच उद्देश आहे की येथे शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे आणि त्यांनी जीवनात सफल होवून अापल्या परिवार व देशाची सेवा करावी.]
Monday, August 29, 2016
*अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या यशाची पहीली पायरी रहमानिया हायस्कूल* आजपर्यंत हज़ारो विद्यार्थ्यांनी मिळवले यश- प्राचार्य मो आदिल रशीद यांचा स्वभावामुळे मिळतेय यश
Posted by vidarbha on 8:46:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment