BREAKING NEWS

Monday, August 29, 2016

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! - ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

नगर-- - सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही. समाजाला निःस्वार्थपणे धर्मशिक्षण देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांमागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातो. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजात असमतोल निर्माण होतो. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी जातीपातीत न अडकता संकुचित वृत्ती बाजूला सोडून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले. येथील सावेडी भागातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. हा मेळावा २७ ऑगस्ट या दिवशी पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी उपस्थित होत्या.
       कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि महर्षी यांच्या संदेशाचे वाचन ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी केले. या वेळी श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि कु. अश्‍विनी कुलकर्णी यांनी स्वसंरक्षण काळाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.
उपस्थित हिंदुत्ववादी आणि मान्यवर : नगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. सुरेखा कदम, माजी महापौर सौ. गीतांजली काळे, भाजप महिला आघाडीच्या सौ. सुरेखा विद्ये, भाजपच्या माजी नगरसेविका सौ. सुमनताई गंधे, हिंदु राष्ट्र्रसेनेचे भिंगार शहराध्यक्ष श्री. सतीश मोरे, बजरंग दलाचे उपशहरमंत्री श्री. अनिल देवराव, जिल्हा संयोजक श्री. बाली जोशी, स्वदेशीचे श्री. ताथेड, वसुंधरा वुमन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वंदना पंडित, अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती सुरेखा सांगळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री संतोष पंडुरे, देविदास मुद्गल आणि पतंजली योग वर्गप्रमुख श्री. निकम आणि वर्गातील महिला साधक

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.