पुणे--- पूज्यपाद
संतश्री आसारामजी बापू यांचे सामाजिक कार्य, वय आदी लक्षात न घेता
कोणत्याही पुराव्याविना त्यांना अटक होते, हे देशाचे दुर्दैव आहे. ही निषेध
सभा केवळ बापूंवर झालेल्या आरोपांविरुद्ध नाही, तर आज समाजात पसरलेल्या
समस्त बुद्धीभेदाच्या वातावरणाविरुद्ध आहे. अन्वेषण यंत्रणाचे अपयश
लपवण्यासाठी बापूंविरुद्ध रचलेले हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून
त्याद्वारे त्यांच्या सांस्कृतिक कार्यावर चिखलफेक करण्यात आली आहे. हा
अन्याय असून आपण या धर्मकार्यात थोडा वेळ काढून सहभागी झाले पाहिजे.
साधूसंत हे अखिल मानवजातीचे असतात; म्हणून त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले
पाहिजे. जोपर्यंत बापूंना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच
ठेवू आणि ते आणखी तीव्र करू, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे अधिवक्ता
श्री. प्रशांत यादव यांनी केले.
येथील डेक्कन भागातील गुडलक चौक येथे २८ ऑगस्ट या
दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना खोट्या आरोपांखाली कारागृहात
डांबण्याच्या काळ्या दिवसाला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संतश्री आसारामजी
बापू प्रेरित युवा सेवा संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या
वेळी ते बोलत होते.
आंदोलनाला योग वेदांत सेवा समितीचे श्री. चेतन चरवड, जनशक्ती संघटनेचे
श्री. अमोल परदेशी, शिवसेना कोथरूड शाखेचे विभागप्रमुख श्री. श्रीपाद
चिकणे, संतश्री आसारामजी बापू साधक परिवाराचे श्री. अमोल कुलकर्णी, हिंदु
जनजागृती समितीचे श्री. योगेश डिंबळे आणि युवा सेवा संघाचे सर्वश्री विपुल
खुरपे, स्वप्नील पेटे आदी मान्यवरांसह १५० हून अधिक भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ
सहभागी झाले होते. आंदोलनाची सांगता 'वन्दे मातरम्' ने झाली.
Post a Comment