नालासोपारा-
धर्मक्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव यांची
आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला धर्माचे आचरण करून धर्मपरायण झाले पाहिजे.
हिंदु पुनर्जन्म मानतात; म्हणून ते मृत्यूला घाबरत नाहीत. ७ लक्ष मुघल
सैन्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ सहस्रावधीच्या संख्येत
असलेले सैन्य लढले; कारण ते सर्व धर्मासाठी लढले. आपणही धर्मासाठी लढलो,
तर आपलाही विजय निश्चित आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हे आपले कर्तव्य
आहे आणि त्याचे पालन प्रत्येक हिंदूने केलेच पाहिजे, असे आवाहन हिंदु
जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु
राष्ट्र्र स्थापनेसाठी नालासोपारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय हिंदू
अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी धर्मकार्यात स्वत:चा
सहभाग आणि संघटन वाढवून संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार उपस्थित
हिंदुत्वनिष्ठांनी केला.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, "भारतावर राज्य करणारे इंग्रज
गेले; पण त्यांचे आचरण आजही अनेक हिंदू करत आहेत. शत्रूंचे बलस्थान समजून
त्याप्रमाणे आपली युद्धनीती ठरवली पाहिजे. आज देशात लोकशाही पद्धत आहे. या
लोकशाहीत ८० टक्के असलेल्यांना दुर्लक्षित जाते आणि १४ टक्के लोकांना
महत्त्व दिले जाते, तर मग ही लोकशाही कशी म्हणता येईल ?"
क्षणचित्रे
१. या वेळी काही हिंदुत्ववाद्यांनी आदर्श राष्ट्रीय हिंदू आंदोलन कसे करावे, याचा प्रायोगिक भाग करून दाखवला.
२. अधिवेशनात सप्तर्षी जीवनाडीतील राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे मार्गदर्शन,
'सनातनपर बंदीका वार पुनः एक बार', 'गणेशोत्सव : वास्तव आणि आदर्श' आणि
'श्री गणेशमूर्तींचे दान करून अधर्म करू नका' या विषयीच्या
ध्वनीचित्रचकत्या दाखवण्यात आल्या.
Post a Comment