सातारा-- - शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राबवण्यात येत असलेली श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम योग्य असून त्याला हिंदु धर्मशास्त्राचा आधार आहे. कोणत्याही शास्त्राचा आधार नसलेल्या 'गणेशमूर्तीदान मोहीम' आणि 'कृत्रिम तलाव' या संकल्पना आम्हाला मागेही मान्य नव्हत्या आणि आताही मान्य नाहीत. भविष्यामध्ये आमच्या सहकारी मंडळांमध्ये याविषयी आम्ही पुढाकार घेऊन जागृती करणार आहोत. तसेच प्रशासनाने बनवलेल्या कृत्रिम तलावांऐवजी पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देणार आहोत, असा एकमुखी निर्धार सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील रजतसागर मंगल कार्यालयामध्ये शहरातील गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली.
या वेळी श्री गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या बैठकीला शहरातील ७० हून अधिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर कोल्हापूर येथील हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मानसिंग शिंदे, विश्व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. आेंकार डोंगरे उपस्थित होते. तसेच या बैठकीला वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन झाले.

Post a Comment