त्या ज्याप्रकारे
मंदिरांत घुसल्या त्याप्रमाणे एकाही मशिदीत जाण्याचे धैर्य दाखवत नाहीत,
यातूनच हे हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते. हिंदु
धर्मामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, राणी लक्ष्मीबाई, राणी
चेन्नम्मा, जिजाऊ,राणी पद्मिनी, काश्मीरची राणी यशोदा, अहिल्याबाई होळकर,
संत जनाबाईंपासून संत मुक्ताबाईंपर्यंत एवढी मोठी परंपरा आहे. सनातन
संस्थेतही ७० टक्के पदांवर महिला आहेत. तेव्हा हिंदु धर्माने स्त्रीला
कोणत्याही बंधनात ठेवलेले नाही; परंतु जर कुणी केवळ प्रसिद्धीसाठी हिंदु
धर्म नष्ट करू पहात असेल, तर आम्ही त्याला कधीच समर्थन देणार नाही, असे
प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांनी केले. एबीपी माझा या
वृत्तवाहिनीवर आयोजित केलेल्या शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर येथील
मंदिर, महालक्ष्मी मंदिर यानंतर केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना
जाण्याचा अधिकार मिळणार का, या प्रश्नावर तसेच उच्च न्यायालयाने हाजी अली
दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्याविषयी घेतलेल्या निर्णयाच्या
पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी श्री.
अभय वर्तक यांच्यासह भाजपचे प्रवक्ता श्री. राम कदम, भूमाता ब्रिगेडच्या
सौ. तृप्ती देसाई, हाजी अली दर्गा ट्रस्टचे मुफ्ती मंजूर उपस्थित होते.
श्री. अभिजीत कारंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या वेळी श्री. अभय वर्तक यांनी शबरीमला येथील मंदिरात महिलांना
प्रवेश देण्यासंदर्भात केरळ उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, १९६५ या वर्षी केरळ उच्च न्यायालयाने ५ ते ५० वर्षे या
वयोगटांतील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असलेला कायदा
केला. त्यानंतर १९९१ मध्ये केरळ उच्च न्यायालयात महिलांना मंदिरांत प्रवेश
मिळावा म्हणून याचिका दाखल करण्यात आली; मात्र तेव्हाही हिंदूंच्या
परंपरांना संरक्षण देत न्यायालयाने महिलांची शबरीमला मंदिरातील प्रवेशबंदी
कायम ठेवली.
Post a Comment