पुणे महानगरपालिका, तसेच अन्य तथाकथित पर्यावरणवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्या वतीने भाविकांना धर्माचरणापासून परावृत्त करत कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सक्ती केली जाते. यंदाच्या वर्षी तर कृत्रिम हौद, मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी उपक्रमांमध्ये अमोनियम बायकार्बोनेट वापरून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या प्रकाराची भर पडली आहे.
या पर्यायाचा महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर तांदळे, तसेच पर्यावरण अभियंता श्री. विकास भिसे उपस्थित होते.
'गणेशोत्सवाच्या काळात दुबई, अबूधाबी, शारजा आदी मुसलमानबहुल देशांमध्ये जाणे होते, तेव्हा तेथेदेखील गणेशोत्सव शास्त्रसंमत पद्धतीने साजरा होत असल्याचे दिसून येते. मग भारतात त्यासंबंधी एवढा वैचारिक गोंधळ का ?', असा प्रश्नही पू. चिंचोलकर यांनी या वेळी उपस्थित केला.
श्री. चंद्रशेखर तांदळे यांनी धर्मशास्त्राला अनुसरून शाडूच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे, तसेच मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे आवाहन केले.
Post a Comment