प्रमोद नैकेले /-----
*अचलपूर*:- आज देशात निर्माण होणा-या विविध समस्या बाबत जनजागृती व विद्यार्थ्यांना भविष्यात करीयर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन जगदंब महाविद्यालय अचलपूर येथे करण्यात आले होते.
देशात जातीय तेढ,महिला सुरक्षा व सायबर क्राईम हे विषय दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे तसेच सुशिक्षीत युवकांसमोर वाढत चाललेल्या रोजगाराची समस्या याबाबत स्थानीक जगदंब महाविद्यालयात आज
अचलपूर,परतवाडा व सरमसपुरा पोलिस स्टेशन च्या माध्यमातून जगदंब शिक्षण संस्था यांनी आपल्या महाविद्यालयात पोलीस अधीक्षक ग्रामीण लख्मी गौतम यांचे मार्गदर्शन आयोजित केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष रमाकांतजी शेरकार प्रमुख वक्ता लख्मी गौतम प्रमुख उपस्थित किरण वानखडे,नरेंद्र ठाकरे,मुकेश गांवडे,रजनी शेरकार,राऊत,भिमराव दखने,रहीमखान,ईश्वरदास वानखडे,कबीर हनफी,निकेश दाभाडे,देवीदास गुलक्षे,प्रमोद नैकेले,श्रीकांत झोडपे,विलास केचे.राहुल मुने यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी.रोहनकर यांनी प्रस्तावीक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.लख्मी गौतम यांनी जातीय सलोखा,महिला सुरक्षा व
बालसुरक्षा कायद्यावीषयी सखोल मार्गदर्शन केले.वाढत असलेल्या सायबर क्राईम बदल सतर्क राहण्यास सांगीतले त्यांनी यावेळी मार्मिक उदाहरण देत म्हटले की आपल्याला फोन येतो की दहा लाखाचे बक्षीस लागले आपण या खात्यात दहा हजार भरा असे दहा हजार रुपयात दह लाख कुणीच देत नाही जगात फक्त आईवडील यांचे प्रेस मोफत मिळते तेंव्हा अशा भुलथापात न येता सरळ पोलिसांना कळवावे तसेच सुशिक्षीत युवकांनी आपले भविष्य स्पर्धापरिक्षेतून बनवावे आय.ए.एस किंवा आय.पी.एस.परिक्षांची तयारी करावी त्यामध्ये भरपुर संधी उपलब्ध आहेत या वेळेस काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले समाधान प्राप्त केले गौतम सरांनी गरिबी ला घाबरून करीयरपासून पळुन जाऊ नका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करा असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात रमाकांतजी शेरकार यांनी आपल्या महाविद्यालयात करीयर मार्गदर्शन ची सुविधा उपलब्ध आहे तसेच एस.पी.साहेब यांनी आपल्या महाविद्यालयात येवुन मार्गदर्शन केले याबाबत त्यांचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन विजय काशीकर व वानखडेमँडम यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी व परिसरातील इतर शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,पत्रकार बंधू व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
Tuesday, August 30, 2016
*जगदंब महाविद्यालयात विविध विषयांवर एस.पी.लख्मी गौतम यांचे मार्गदर्शन संपन्न*
Posted by vidarbha on 7:37:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment