प्रमोद नैकेले /----
*अचलपूर* :-अचलपूर शहर अतिसंवेदनशील असून यावेळी गणेशोत्सव व बकरीईद सोबत येत आहे यादरम्यान शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राहावे म्हणून अचलपूर सरमसपूरा पोलीस स्टेशन ची संयुक्त शांतता समिती ची सभा संपन्न झाली. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांचे प्रमुख उपस्थितीत अचलपूर व सरमसपूरा पोलीस स्टेशन ची संयुक्त शांतता समिती ची सभा झाली या सभेत शांतता समितीचे सदस्य,गणेशमंडळाचे सदस्य,डी.जे.संचालक,मुस्लिम बांधव,राजकीय नेते,पोलीस पाटील,तंटा मुक्ती सदस्य,पत्रकार व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी प्रल्हाद अग्रवाल,निळकंठ पाटील,विश्वास गवई,मोहन गोखले व पोलीस पाटील यांनी आपल्या समस्या व विचार मांडले.अधीक्षक लख्मी गौतम यांनी याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे नेहमी प्रमाणे सर्व शांततेत व आनंदाने आपले सण साजरा करावा अश्या सुचना दिल्या.पोलीस केवळ पंचाचे काम करतात जर सर्व व्यवस्थित चालू असले तर पोलीस तुमच्या सोबत आहेत पण फाऊल झाले तर शिटी वाजवून पिवळे व लाल कार्ड द्यायचे काम करावे लागतात.पालकांनी आपल्या मुलांना सांभाळले तर काहीच अनर्थ होत नाही.रहदारी,रस्ते ,लाईट व अवैध फ्लेक्स वर योग्य ती कारवाई करण्यात येईल.महिला सुरक्षा हे सर्वात महत्त्वाचे आहे.चिडीमार,छेडखानी व कायदा हातात घेणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणेदार नरेंद्र ठाकरे व मुकेश गांवडे यांना त्यांनी दिले तसेच रस्त्यावर दुचाकी वर स्टंट व रहदारी ला अडसर निर्माण करणा-यावर कारवाई करण्यात यावी रस्त्यावरील अडसर दूर करावे या सभेत नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीचे रामावत व नंदवंशी उपस्थित होते.
Tuesday, August 30, 2016
*गणेशोत्सव व बकरी ईद निमीत्त अचलपूरमध्ये शांतता समिती ची सभा संपन्न*
Posted by vidarbha on 7:33:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment