रंगय्या रेपाकवार /----- गडचिरोली /---
गडचिरोली जिल्हयाचे 35 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद गडचिरोली येथील विर बाबुराव शेडमाके सभागृहात रक्तदान व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी प्रथम रक्तदान करुन शिबीराचा शुभारंभ केला.
यावेळी अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, रक्तसंकलन अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, डॉ. भडारी, डॉ. महेश गौरी , व्ही.एम. सोमनकर, एन.एन.शेंडे, कोटगले प्रामुख्याने उपस्थित होती.
शिबिरात 287 अधिकारी/कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यापेकी 35 जणांनी रक्तदान केले.
Post a Comment