शेगाव :(मनोजकुमार वर्मा /-- महेद्र मिश्रा )/---
आकोट मार्गावरील रेल्वे क्रासींगवर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याची नागरिकांची ओरड होती. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दूर्लक्ष केल्याने रविवारी शेगाव प्रेस क्लबच्या पत्रकारांनी पुढाकार घेवून श्रमदानाने पाणी निचण्याकरिता उड्डाणपुलावर असलेल्या मोर्यांची सफाई केली.
नवीनच बांधण्यात आलेल्या पुलाचा नामकरण सोहळा कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्यमंत्री शिंदे, आ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, नगराध्यक्ष शारदाताई कलोरे यांच्या उपस्थितीत नुकताच नुकताच पार पडला.या पुलाला अहिल्याबाई होळकर असे नामकरण करण्यात आले. परंतु पुलावरील पाण्याचा निचरा सुरवातीपासूनच होत नाही. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्याची ओरड होत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी पाणी साचून खाली असणार्या दुकानावर रहिवाशीयांना होत होता.
शेवटी शेगाव प्रेस क्लबच्या पत्रकारांनी श्रमदानातून या नाल्यांना साफ करण्याचा उपक्रम हाती घेतला. याबाबतीत मुख्याधिकारी अतुल पंत यांना सांगितले असता त्यांनीही श्रमदान करुन पुर्ण वेळ पत्रकारांना सोबत त्या मोर्यांची सफाई, दोन्ही कडेला साचलेली माती उकरुन काढली आणि पुलाच्या एका बाजुने पाणी निचरा व्यवस्थीत होतांना नागरिकांनी पाहुन शेगाव प्रेस क्लबच्या या अभिनव उपक्रमाची प्रशंसा केली तर नागरिकांनी यामध्ये श्रमदान ही केले.
यामध्ये शेगाव प्रेसक्लबचे अध्यक्षमहेंद्र व्यास, सचिव गजानन कलोरे, देवानंद उमाळे, विजय मिश्रा, मनोज वर्मा, बद्रीप्रसाद अवस्थी, दिपक सुरोसे, महेंद्र मिश्रा, समीर देशमुख, भावेश शर्मा, अमर बोरसे, सतीश अग्रवाल, इत्यादी होते तर न.प.कर्मचारी आर.पी.इंगळे, संजय साबळे, शक्ती देशमुख आणि समाजसेवक सादीक साहेब यांनी ही या उपक्रमात श्रमदान करुन सहभाग घेतला. ■ शेगाव प्रेस क्लबच्या सदस्यांनी उड्डान पुलावरील मोर्यांची साफ-सफाई करुन आदर्श निर्माण केला आहे. स्वत: साफ-सफाई करताना पाहून नागरिकांनीही पत्रकारांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यामुळे संबंधित विभागाचा दूर्लक्षपणा उघड दिसून येतो
Post a Comment