चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रहार संघटनेची चांदुर रेल्वे शहर व तालुका कार्यकारीनी नुकतीच गठीत झाली असुन या नवीन कार्यकारीणी तर्फे रविवारी रक्तदान शिबीर तसेच शहरात प्रथमच अचलपुर चे तडफदार आमदार, अपंगांच्या मागण्यांकरीता सदैव तत्पर असणारे व प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चु कडु यांच्या जाहीर सभेचे स्थानिक अशोक महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. आमदार कडुंच्या भेटीसाठी दुरदुरून अपंग बांधव चांदुर शहरात आले होते. स्थानिक प्रहार संघटनेतर्फे रविवारी सकाळी स्थानिक अशोक महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील युवकांसह अशोक महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत ठाकरे व विद्यार्थ्यांनीही रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला. यानंतर दुपारी प्रहार संघटनेचे संस्थापक, अचलपुरचे आमदार बच्चु कडु यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. बच्चु कडुंचे शहरात आगमन होताच चाहत्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने व हारार्पनाने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेमध्ये मंचावर आमदार बच्चु कडुंसह धोटे सर, छोटू महाराज वसु, प्रदीप वडस्कर, प्रवीन हेंडवे, प्रफुल डाफ, फिरोज पठान, हरीश वऱ्हाडे, अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत करमोरे आदी प्रामुख्याने उपस्थीत होते. यावेळी बच्चु कडुंनी शेतकऱ्यांच्या व अपंग बांधवांच्या प्रश्नावर शहरवासीयांना संबोधले तसेच नवीन कार्यकारीणीचे भरभरून आपल्या भाषणातुन कौतुकही केले. बच्चु कडुंना भेटण्याकरीता आजुबाजुच्या शहरासह तालुक्यातील अनेक अपंग बांधव शहरात आले होते तसेच काहींनी आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम तायडे यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष सौरभ इंगळे यांनी मानले. सभेला अनेक शहरवासी प्रामुख्याने उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रहार तालुकाध्यक्ष सौरभ इंगळे, विक्रम तायडे, अक्षय बाबर, राहुल अंबापुरे, प्रदीप नाईक, अंकुश इंगळे, योगेश भोले, पंकज जाधव, मयूर देशमुख, सूरज निहाटकरसह अशोक महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनीही अथक परीश्रम घेतले.

Post a Comment