BREAKING NEWS

Tuesday, August 30, 2016

पिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाचा जनता दलाने नोंदविला निषेध.-मातंग समाज कृती समीतीच्या आंदोलनाला जनता दलाने दिला पाठींबा. <><> खुनाचे प्रयत्न कशासाठी अघोरी विद्याप्राप्तीसाठी की कीडणी विकण्यासाठी ?- डॉ. ढोले. <><>

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील  संत शंकर महाराज आश्रमात नरबळीचा प्रकार घडल्याची बाब काही दिवसांपुर्वी उघडकीस आली. या घटनेचा सगळीकडे निषेध होत असतांना जनता दलाच्या वतीनेही या घटनेचा निषेध नोंदविला व ३ सप्टेंबरला अमरावती येथे  होणाऱ्या मातंग समाज कृती समीतीच्या आंदोलनाला जनता दलाने पाठींबा दर्शविला आहे.

       शहरात नुकतीच जनता दल (सेक्युलर)ची सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले हे होते तर प्रमुख अतीथी म्हणुन सरचिटणीस अैड. नंदेश अंबाडकर व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थीत होते. पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज आश्रमात घडलेल्या नरबळीच्या प्रकरणाराचा या सभेत निषेध नोंदविण्यात आला. प्रथमेश सगणेचा अंधश्रध्देच्या झोतात गळा चिरण्याची घटना अत्यंत क्रूर असून हा प्रकार नरबळीच्या उद्देशाने करण्यात आला. यामध्ये चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील अजय वनवे वरही नरबळीच्या हेतुने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आश्रमातील या प्रकरणाच्या निषेधार्थ व खऱ्या दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी ३ सप्टेंबरला मातंग समाज कृती समीतीच्यावतीने अमरावती येथे होणाऱ्या आंदोलनाला जनता दलाचा पाठींबा असल्याचेही माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी सभेत बोलतांना डॉ. ढोले म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापणदिनी जर मागासलेला समाज असुरक्षीत असेल तर लोकशाहीर अण्णाभाउ साठेंनी काढलेले उद्गार, "ये आझादी झुठी है, आधी जनता भुकी है" हे आजही खरे आहे. तसेच आश्रमशाळेतील खुनाचे प्रयत्न कशासाठी अघोरी विद्याप्राप्तीसाठी की कीडणी विकण्यासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थीत केला व याची शासनाने चौकशी करावी अशी मागणी केली.
            मातंग सामाज कृती समीतीच्या आंदोलनामध्ये जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सभेमध्ये संजय डगवार, दादाराव डोंगरे, सुधीर सव्लालाखे, धर्मराज वरघट, अंबादास हरणे, सुशिलाबाई झाडे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.