केंद्रीय कर्मचाऱ्याना गेल्या दोन
वर्षांचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण
जेटली यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यानमध्ये
आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 33 लाख केंद्रीय कर्मचाऱ्याना याचा फायदा होणार आहे. या कर्मचाऱ्याना 2014-15 आणि 2015-16 अशा दोन वर्षांचा थकित असलेला बोनस मिळणार आहे. हा बोनस सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू करण्यात येणार आहे.
तसेच बिगरशेती कर्मचाऱयांना किमान दैनंदिन वेतन साडेतीनशे रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणाही जेटलेंनी केली आहे. यामध्ये दररोज किमान 246 रुपये असल्यास वेतनात 104 रुपयांची वाढही करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्याना या सणासुदीच्या दिवसात चांगलाच आनंद मिळणार आहे.

Post a Comment