BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

हिंदूंनी केलेल्या दुर्लक्षामुळे भारतातील हिंदूंवरच पलायनाची वेळ ! - श्री. सुशील तिवारी, स्वराज्य हिंदु सेना

मुंबई -



हिंदूसंघटनाचा अभाव आणि धर्माविषयीचे अज्ञान हेच हिंदूंच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे. आज आतंकवाद काश्मीर, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांसह संपूर्ण देशभर पसरला आहे. आपल्या अनेक हिंदु बांधवांचे धर्मांतर होत आहे; परंतु हिंदू या समस्यांविषयी अजूनही जागृत होत नाहीत. उलट या समस्यांवर उपाय शोधण्यापेक्षा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचेच फलित म्हणजे हिंदूंना भारतातच पलायन करण्याची वेळ आली आहे, असे मार्गदर्शन स्वराज्य हिंदु सेनेचे श्री. सुशील तिवारी यांनी केले. येथील अंधेरी (पू.) येथे ३० जुलै या दिवशी आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. असंघटित हिंदूंनी आता संघटित व्हायला हवे. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात सनातनला छळले; मात्र हिंदू ज्यांच्याकडे आशेने बघतात, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातही सनातनचा छळ चालू आहे, हे अतिशय दुःखद आहे, असेही ते म्हणाले.
       या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी सामाजिक दुष्प्रवृत्तींचा संघटित प्रतिकार आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य आणि रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी स्वरक्षा ही काळाची आवश्यकता या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला अधिवक्ता नितीन गवस आणि भाजपचे अंधेरी विभाग अध्यक्ष श्री. चिंतामणी धर्णे यांच्यासह १०० हून अधिक हिंदू उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला साध्या गणवेशातील आतंकवादविरोधी पथकाचे २ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
       मेळाव्यात प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु प.पू. डॉ. आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश आणि जीवनाडीतील सप्तर्षींचा संदेश वाचून दाखवण्यात आला. सप्तर्षी जीवनाडीतील राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे मार्गदर्शन आणि सनातनपे बंदीका वार पुनः एक बार यांविषयीचे लघुपटही दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
विशेष सहकार्य - मेळाव्याला अंधेरी येथील श्री लंबोदर गणेश संस्थान, श्री विघ्नेश्‍वर सोसायटी आणि मोकला डेकोरेटर्सचे श्री. विजय मोकल यांचे विशेष साहाय्य लाभले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.