BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे हिंदु धर्मालाच कलंकित करण्याचा प्रयत्न ! - श्री. विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

 जळगाव -

 


प्रत्येक हिंदूने धर्माचा प्रवक्ता व्हायला हवे. आज धर्म कुठेच शिकवला जात नसल्यामुळे हिंदूंना धर्मासाठी एक व्हा, असे सांगावे लागते. सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते; मात्र आज तिच्यावरच बंदी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हा एकप्रकारे हिंदु धर्माला कलंकित करण्याचाच प्रयत्न आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी केले. येथील एकचक्रनगरी (एरंडोल) येथे ३० जुलै या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते.
       या मेळाव्याला ह.भ.प. गजानन महाराज वरसाळेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. संघटन मेळाव्यापूर्वी सभागृहामध्ये संतांनी गायलेली भजने लावल्यामुळे वातावरणात चैतन्य जाणवत होते, तर कार्यक्रमाच्या आरंभी धर्माभिमान्यांनी ढोलताशे वाजवून त्यांचा उत्साह व्यक्त केल्यामुळे वातावरणात वीरश्री निर्माण झाली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांचा सत्कार धर्माभिमानी श्री. श्रीकांत कासार यांनी केला, तर रणरागिणी शाखेच्या कु. पूजा जाधव यांचा सत्कार सौ. रेणुका बिरला यांनी केला.
मुलींवर अत्याचार करणार्‍या वासनांधांचा
💧  चौरंगाच करायला हवा ! - कु. पूजा जाधव, रणरागिणी शाखा 💧
       धरणगाव येथील ५-६ वर्षांच्या मुलीला धर्मांध युवकाने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी वाचली; पण नंतरचे २ दिवस ती अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होती. पोलिसांनी धर्मांधाच्या विरोधात चुकीच्या कलमांद्वारे गुन्हा प्रविष्ट केला. अशा धर्मांधांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या नीतीनुसार चौरंगाच करायला हवा. तसे झाल्यासच वासनांधांना वचक बसेल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.