नवी दिल्ली /--- - २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारताच्या १२० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येत फक्त ३३ सहस्र जण स्वतःला नास्तिक मानतात, म्हणजेच देशात सध्या केवळ ०.००२७ टक्के जनता नास्तिक आहे. यात ५० टक्के प्रमाण महिलांचे आहे. तसेच गावातील लोक शहराच्या लोकांच्या तुलनेत धर्म सोडून नास्तिक बनण्यात पुढे आहेत. त्यातही महाराष्ट्र राज्य नास्तिक लोकांच्या संदर्भात सर्वांत पुढे आहे. येथे ९ सहस्र ६५२ लोकांनी स्वतःला नास्तिक घोषित केले आहे. दुसरीकडे बंगालसारख्या देव न मानणार्या बहुसंख्य साम्यवाद्यांच्या राज्यात केवळ ७८४ जणांनी स्वतःला नास्तिक म्हटले आहे.
जगातील एकूण नास्तिक लोकांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागत असल्याचा दावा प्यू रिसर्च सेंटरने केला होता. अहवालात भारतात नास्तिकांची संख्या ७ लाखांपेक्षाही अधिक म्हटली गेली होती; मात्र जनगणनेच्या आकडेवारीनुसार ती खरी नसल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment