बेळगाव -

ऋषिमुनी, तसेच संत यांनी सांगितलेल्या शास्त्राप्रमाणेच सनातन संस्थाही समाजप्रबोधन करत आहेत. समाजातील अध्यात्म आणि धर्म यांविषयीचे चुकीचे समज दूर होऊन समाज नीतीवान होण्यासाठी सनातनकडून अनेक उपक्रम राबवले जातात. याच माध्यमांतून चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन श्री. सचिन इनामदार यांनी केले. येथील रामनाथ मंगल कार्यालयात हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्रप्रेमी मित्र परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या होणार्या मागणीला विरोध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. इनामदार पुढे म्हणाले, आमचा हा मित्र परिवार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तसेच कोणत्याही संघटनेचेही आम्ही सभासद नाही; परंतु आम्ही हिंदु धर्माशी निगडीत सकारात्मक विचारविमर्श करून हिंदु धर्म आणि समाज यांच्या समृद्धीसाठी कार्य करत असतो. सनातन संस्थाही गेली अनेक वर्षे हेच कार्य करत आहे.
या पत्रकार परिषदेला धर्मप्रेमी सर्वश्री भालचंद्र जाधव, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर उपस्थित होते, तसेच हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी ३० हिंदुत्वनिष्ठही उपस्थित होते.

Post a Comment