BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात प्रसंगी रस्त्यावरही उतरू ! - चैतन्य छत्रेगुरुजी 💧 💧 बेळगाव पुरोहित संघाच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद 💧 💧

बेळगाव -

सनातनचे कार्य हिंदूंना प्रेरणा देणारे आहे. असे असतांना तिच्या साधकांचा नाहक छळ केला जात आहे. कोणतेही आरोप सिद्ध झालेलेे नसतांना पुरोगाम्यांची सनातनवर बंदी घालण्याची ओरड का ? आम्हा पुरोहित सदस्यांचा सनातन संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे. समाजाला दिशा देणार्‍या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे. या अन्यायकारक बंदीला आमचा पूर्ण विरोध आहे. यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू, अशी चेतावणी श्री. चैतन्य छत्रेगुरुजी यांनी दिली. येथील अनसूरकर गल्ली, छत्रेवाडा येथे ३० जुलै या दिवशी बेळगाव पुरोहित संघाच्या वतीने सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. व्यासपिठावरील उपस्थित अन्य गुरुजींनीही सनातनच्या कार्याचा गौरव करत सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवला.
     श्री. चैतन्य वासुदेव छत्रेगुरुजी म्हणाले, समाजात धर्माचे प्रबोधन करून धर्माचरणाच्या कृती कशा करायच्या, याविषयी मार्गदर्शन करून धर्मजागृती करणारी सनातन संस्था ही हिंदूंना अभिमान वाटावा, अशी संस्था आहे; मात्र काही पुरोगामी राजकीय हेतूने प्रेरित होऊन सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत.
अन्य पुरोहितांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार
१. श्री. हृषिकेश हेर्लेकरगुरुजी - सनातन संस्थेच्या माध्यमातून भगवंताचे धर्मरक्षणाचे अवतारी कार्य चालू आहे !
२. श्री. वाळवेकरगुरुजी - सध्या कलियुगात धर्मरक्षणाचे कार्य सनातन प्रभातच्या माध्यमातून प्रभावीपणे चालू आहे.
३. श्री. महेश कडवाडकरगुरुजी - सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदू आणि हिंदु संघटना यांना अपकीर्त करण्याचे कारस्थान तथाकथित पुरोगाम्यांकडून केले जात आहे. सनातनच्या संदर्भातही तसेच घडत आहे.
४. श्री. वसंत जोशीगुरुजी - समाजात निरपेक्षपणे धर्मप्रसार आणि हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी प्रयत्न करणारी एकमेव संस्था म्हणजे सनातन संस्था !

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.