
अमरावती / सुरज देवहाते /-----
अमरावती मधील स्थानिक केमिस्ट भवन येथे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता बैठक घेण्यात आली . यात आम आदमी पक्षाने केलेल्या कार्य आढावा घेण्यात आला व वरिष्ठ सदस्यांचे मुंबई येथील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती मेनन ( शर्मा ) यांचा सोबत केलेल्या चर्चे बाबत सुधा उपस्थित सदस्यांना माहिती देण्यात आली. यात सर्वच पदाधिकार्यांनी उपस्थीत असणार्यांना मार्गदर्शन केले . स्थानिक पातळीवर पार्ट्य संघटन वाढवणे, येणाऱ्या काळात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा अमरावती आगमनानिमित्य रूपरेषा, मुंबई येथील भेटीचा संदर्भातील चर्चा स्थानिक सदस्यांन सोबत ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,या संदर्भात सदर बैठकी मध्ये चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थिताना आपल्या जवळपास कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर त्याची माहिती आम आदमी पक्षाला द्या असेही सांगण्यात आले
सदर मिटिंग ला काही तालुक्यातील सदस्य देखील उपस्थित होते त्यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याचे पूर्व संयोजक श्री नितीन गवळी , श्री नितीन उजगावकर , अब्दुल बशीर शेख , श्री संजय शहाकार,श्री वीरेंद्र उपाध्याय , श्री महेश देशमुख , श्री प्रो अतुल वानखडे , श्री व्ही पाटील , श्री प्रवीण शेगोकार , सुरेश राउत , सुधीर तायडे , आशिष शुक्ला , राजूभाऊ भडांगे , यांच्यासह सर्व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आतापर्यंत आम आदमी पक्षामार्फत केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला . यावेळी सुत्रसंचालन अब्दुल बशीर शेख यांनी.
Post a Comment