चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
डाॅ.पांडूरंग ढोले हे नाव कुर्हा या गावातील गरीब कुटुंबातुन महाराष्ट्रच्या राजकारणात नावलौकिक झाले. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1950 मध्ये कुर्हा या गावी झाला. ते प्रभात आरोग्य शिक्षण संस्थाचे 1979 पासून अध्यक्ष,भारत व्यायाम शाळा कुर्हाचे अध्यक्ष 1980-88, मंडल आयोगाबाबतच्या आदोलनात सहभाग, संचालक महाराष्ट्र राज्य पर्टयन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.)1984-89, सभापती 1984ते 1990 च्या काळात चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदावर राहून शेतकर्यांच्या हिताचे चांगले निर्णय घेण्यात यांनी यश संपादन केले. म्हणून मतदारसंघ एक शेतकरी नेता म्हणून ही त्याची ओळख होती.
अमरावती जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्षनेता,यंशवत शेतमाल जिंनिग सहकारी संस्था,जिजामाता हाॅसिंग सोसायटी चांदूर रेल्वे,सरचिटणीस महाराष्ट्र जनता दल, सक्रीय राजकारणात सोबात चांदूर रेल्वे वैद्यकीय क्षेञात राहून गोरगरीब जनतेची सेवा ही केली. आपल्या राजकीय जिवनांत अनेक राष्ट्रीय नेत्याच्या व महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्या सोबत राहून लोकहिताचे कामें केली.1990 पर्यंत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस पक्षात सक्रीय राजकारणात राहून अनेक लोकहिताचे आंदोलन केले. पक्षातील अंतर्गत वादामुळे 1990 ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली त्यांत त्यांना पराजय आले. या नंतर 1994 मध्ये चांदूर रेल्वे तालुक्यात महापूर आले या पूरात तालुक्यातील शेतकरी शेतमजुराचे अंतोनात नुकसान झाले.
या झालेल्या नुकसानाची परतफेड प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने वेळेवर करावी व मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी म्हणून आपल्या जिवाचे रान केले. संपूर्ण मतदारसंघ यांनी आपल्या दुचाकीवर पिंजून काढला व या दरम्यान डाॅ.ढोले यांनी मोर्चे व उपोषणाच्या मार्गाने जनतेला न्याय मिळवून दिले. जनतेने ही या लोकनेत्याला त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून 1995 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल पक्षातर्फे निवडून दिले व मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी डाॅ ढोले साहेबांना जनतेनी दिली होती. या वेळी महाराष्ट्रात सेना- भाजप युतीचे सरकार होते.
जनतेच्या मागण्याकरीता विधानसेभेत मतदारसंघातील अनेक प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. आमदार असतांना त्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी थेट जनावरांना घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर घेऊन गेले. हे त्यांचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. ओबिसी क्रांती दल स्थापन करून महाराष्ट्रातील ओबिसी विद्यार्थ्यांना सर्व प्रथम शिक्षवृत्ती मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य या लोकनेत्याने केले.1995 ते 2000 पर्यंत चांदूर रेल्वे मतदारसंघातील नगर परिषद,ग्राम पंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद च्या निवडणुकीत जनता दलाचे वर्चस्व प्रस्थापित केले.
आमदार असल्यावर ही या लोकनेत्याने कधीच आपल्या आमदारकीचा आव आणला नाही. सतत आपल्या दुचाकीवर मतदारसंघ फिरने व शेतकरी शेतमजुराच्या मागण्याकरीता उपोषण, मोर्चे,आंदोलन करण्याचा जणू त्यांनी विडा उचलला होता व हे कार्य आजपर्यंत सुरू होते. चांदूर रेल्वे तालुक्यातील जनतेला मुबंई जाण्या करीता विदर्भ एक्सप्रेसला थांबा मिळवून देण्याचे महत्वाचे काम ही आमदार ढोले यांनी केले.
आपल्या जिवनांत नेते किंवा आमदार म्हणून कधीच राहीले नाही. एक कार्यकर्ते म्हणून मतदारसंघ त्यांची ओळख होती,अशा या लोकनेत्यावर गुरूवारी सकाळी अचानक काळाने त्यावर झडप घातली. ही वार्ता वारासारखी मतदारसंघ पसरली व लोंढेच्या लोंढे डाॅ ढोले यांच्या निवासस्थानाकडे जाऊ लागले.
Thursday, April 6, 2017
खरंच देवाला ही चांगले माणसं आवडतात,हे आज खरे झाले.-शेतकरी शेतमजुराचा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड.
Posted by vidarbha on 10:31:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment