चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
चांदुर रेल्वे शहर शैक्षणिक, व्यावसायिक व प्रशासकीय व्यवहाराचे केंद्र आहे. त्यामुळे येथे बाहेर गावावरून ये-जा करणा-यांची संख्या जास्त आहे. शहराला जवळपास ६० पेक्षा जास्त गावे जुळलेली आहे. मात्र, या आवश्यकतेनुसार शहरात रेल्वेस्टॉपेज देण्यात आलेले नव्हते. अशातच सन १९९५ मध्ये आमदार म्हणुन निवडुन आल्यानंतर डॉ. पांडुरंग ढोलेंनी आंदोलन करून शहरात विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळवुन दिला होता.
सन १९९५ मध्ये चांदुर रेल्वे शहर महत्वांच्या शहरांपैकी व्यापारामध्ये एक महत्वाचे शहर म्हणुन प्रसिध्द होते. त्या काळी शहरात अनेक मोठ मोठे उद्योग होते. चांदुर रेल्वे शहरात तयार होत असलेला माल त्याकाळी संपुर्ण महाराष्ट्रात जात होता. मात्र दुरवर प्रवास करण्यासाठी शहरवासीयांना चांगली सुविधा उपलब्ध नव्हती. माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले हे १९९५ मध्ये राष्ट्रीय जनता दल (सेक्युलर) तर्फे आमदार म्हणुन निवडुन आले होते. त्यावेळी त्यांच्या ही समस्या लक्षात येताच त्यांनी मोठे जनआंदोलन करून शहराला विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळवुन दिला होता. तेव्हापासुन सुरू झालेली ही ट्रेन अजुनही चांदुर रेल्वे शहरात थांबत असुन अनेक विद्यार्थी, व्यापारी, तालुकावासी दररोज प्रवास करतात. मात्र गुरूवारी माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांचे निधन झाले असुन विदर्भ एक्सप्रेस त्यांच्या आठवणीत राहणार आहे.
Thursday, April 6, 2017
चांदुर रेल्वेला विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळवून देणारे माजी आ. डॉ. ढोले
Posted by vidarbha on 10:33:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment