BREAKING NEWS

Thursday, September 1, 2016

जानवानी परीवारातर्फे आज पोळा उत्सवात होणार शेतकऱ्यांचा सन्मान.-तान्हा पोळ्यातही होणार बक्षीसांची लयलुट-पोळा उत्सव समीतीचे आयोजन

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)-
  भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्यांच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. अशातच आज पोळा सणानिमित्त्याने खडकपुरा पोळा उत्सव समीतीतर्फे शहरात आयोजीत केलेल्या भव्य पोळा उत्सवात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा शेला व श्रीफळ देवुन सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जानवानी परीवारातर्फे सन्मान करण्यात येणार आहे.
  सालाबादाप्रमाणे यंदाही शहरातील खडकपुरा या परंपरागत जागेवर पोळा उत्सव समीतीतर्फे आज गुरूवारी मोठा पोळा व शुक्रवारी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  आज सायंकाळी शहरातील तसेच जवळील गावातील शेतकरी बैलजोडी सजवुन या पोळ्यामध्ये आणणार आहे. यावेळी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा स्व. सिद्दीकभाई जानवानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते साजिद जानवानी यांच्याकडुन शेला व श्रीफळ देवुन तसेच अतुल मोरे यांच्याकडुन टोपी देवुन सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर शुक्रवारी याच परीसरात तान्हा पोळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील अनेक चिमुकले सहभागी होणार असुन चिमुकल्यांनी उत्कृष्ट सजविलेल्या बैलाला प्रथम बक्षीस स्व. हाजी मो. सिद्दीक जानवानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हाजी मो. रफीक जानवानी परीवारातर्फे ५५१ रूपये व स्कुल बॅग, द्वितीय बक्षीस बीटीएल एचपी गैसतर्फे ४५१ रूपये व स्कुल बॅग, तृतीय बक्षीस स्व. महादेवराव माकोडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशांत माकोडे यांच्यातर्फे ३५१ रूपये व स्कुल बॅग, चतुर्थ बक्षीस स्व. पंडीत दत्तात्रय शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ पत्रकार गुड्डु शर्मा यांच्यातर्फे २५१ रूपये व स्कुल बॅग, पाचवे बक्षीस स्व. मुन्ना शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुड्डु शर्मा यांच्यातर्फे १५१ रूपये व स्कुल बॅग तसेच प्रोत्साहन बक्षीस स्व. मुन्ना शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ विधी व शिवराज शर्मा तर्फे २०० कलर बॉक्स देण्यात येणार आहे.
      सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती म्हणुन आमदार विरेंद्र जगताप, सभापती प्रभाकरराव वाघ, तहसिलदार राजगडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मरसकोल्हे, ठाणेदार गिरीष बोबडे उपस्थीत राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोळा उत्सव समीतीचे कार्यकर्ते अथक परीश्रम घेत आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.