फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी !
नालासोपारा येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते |
मुंबई जिल्हाधिकारी श्री. कुशवाहा यांना निवेदन देतांना कार्यकर्ते |
मुंबई- - फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. निवेदन देतांना हिंदू गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, मनसे यांसह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनाला व्यापारी
आणि फटाके विक्रेते यांचा सकारात्मक प्रतिसाद
बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना निवेदने !
नवी मुंबई येथील बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली. या वेळी सर्व दुकानदारांनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले अन् चिनी फटाक्यांची विक्री करत नसल्याचे सांगितले, तर काहींनी अशा प्रकारे फटाक्यांची विक्री करणे योग्य नसल्याचे सांगून समिती करत असलेले कार्य योग्य असल्याचे म्हटले. समितीच्या वतीने सौ. तनुजा यादव, सौ. मंगल खोत, सौ. रेखा सावरकर यांनी ही निवेदने दिली.बनखोडे परिसरातील ४० फटाके विक्रेत्यांना निवेदने !
Post a Comment