म्हापसा येथे धर्माभिमानी हिंदूंच्या बैठकीत निर्णय
बैठकीत समोरील बाजूला डावीकडून सौ. शुभा सावंत,
श्री. जयेश थळी आणि बैठकीत विचार
मांडतांना एक हिंदुत्वनिष्ठ
|
म्हापसा--मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. त्याचसमवेत युवकांचे संघटन करण्याचा निर्णय हिंदु धर्माभिमान्यांकडून घेण्यात आला.
म्हापसा येथे झालेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ या सभेनंतर कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी संघटितपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने तृतीय आढावा बैठक नुकतीच झाली. मंदिरांचे पावित्र्य राखण्याच्या संदर्भात बार्देश तालुक्यातील देवस्थान समित्यांना भेटून प्रबोधन करण्याचे या वेळी ठरले. मंदिरात येणार्या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना करण्यात येणार आहे. या बैठकीत अनेकांनी त्यांचे विचार व्यक्त केले. बैठकीला उपस्थित धर्माभिमानी श्री. उदय मुंज यांनी या दृष्टीने पुढाकार घेऊन कृती करणार असल्याचे सांगितले. श्री. जयेश थळी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी सौ. शुभा सावंत उपस्थित होत्या.
Post a Comment